मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी सह १० जणांवर सीबीआयने नोंदवला गुन्हा

२०१२-२०१८ दरम्यान ८०५ कोटींपेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या फायद्याकरून घेतल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी सह १० जणांवर सीबीआयने नोंदवला गुन्हा
SHARES

जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन जी वेंकट कृष्णा रेड्डी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्यावर ८०५ कोटींच्या गैरव्यवहाराचा दावा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) दाखल केलेल्या खटल्यात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी आणि नऊ अन्य खासगी कंपन्यांचेही नाव असून एफआयआरनुसार, सर्वांनी स्वतःसाठी आणि २०१२-२०१८ दरम्यान ८०५ कोटींपेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या फायद्याकरून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे २०१८ मध्ये दरम्यान सरकारचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड किंवा एमआयएएल नावाची संयुक्त कंपनी जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड, एअरपोर्ट ऑथॉरिटी इंडिया आणि इतर काही विदेशी संस्थांनी तयार केली होती. त्यात जीव्हीकेचे ५०.५  टक्के शेअर्स आहेत आणि २६ टक्के एएआयकडे आहेत.जीव्हीके रेड्डी एमआयएएलचे चेअरमन आहेत आणि जीआयव्ही संजय रेड्डी यांचेही एफआयआरमध्ये नाव आहे, ते एमआयएएलचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तपास यंत्रणेने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला आहे की, आरोपींनी इतर नऊ खासगी कंपन्यांशी करार करून ३१० कोटींची फसवणूक केली आहे. तसेच२०१७-१८  दरम्यान मुंबई विमानतळाच्या आसपास २०० एकर अविकसित जमीनवर रिअल इस्टेट विकसित केली गेली आहे, ऐवढ्यावरच न थांबता "जीएके ग्रुप ऑफ कंपनीच्या प्रवर्तकांनी एआयएला नुकसान पोहचविण्याच्या हेतूने २०१२ ते २०१ ८ दरम्यान एमआयएएलच्या अतिरिक्त रकमेवर काम केले असल्याचे आरोप सीबीआयने लावलेले आहेत. तसेच एमआयएएलमध्ये एमआयएएलचा खर्च वाढविण्यासाठी जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीच्या प्रवर्तकांनी संयुक्त उद्यम कंपनीच्या १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम लाटल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

हेही वाचाः- यंदा डासांमुळं होणाऱ्या आजारांमध्ये घट


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा