नवी मुंबई महानगरपालिका (nmmc) गणेशोत्सवासाठी शहरात 170 कृत्रिम विसर्जन कुंड उभारणार आहे.
नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा आणि नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्तींचे (ganpati idol) विसर्जन करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
न्यायालय आणि महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गणेशमूर्तींचे विसर्जन (immersion) जवळच्या कृत्रिम कुंडात करावे, असे आवाहन महापालिकेने रहिवाशांना केले आहे.
सहा फुटांपर्यंत उंची असलेल्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात करणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना 'प्लास्टर ऑफ पॅरिस' (PoP) ऐवजी नैसर्गिक शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींची निवड करून पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांना घराच्या जवळ विसर्जनाची सोयीस्कर सुविधा मिळावी आणि शहरातील नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने 170 कृत्रिम विसर्जन कुंड उभारले जात असल्याचे नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिकेने सांगितले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कृत्रिम कुंडांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.महापालिकेच्या आठ प्रशासकीय विभागांमध्ये हे कुंड उभारले जात आहेत.
यामध्ये बेलापूर (22), नेरुळ (29), वाशी (16), तुर्भे (21), कोपरखैरणे (16), घणसोली (16), ऐरोली (25) आणि दिघा (25 - गावांसह) येथील कुंडांचा समावेश असून, एकूण संख्या 170 इतकी आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने गणेश मंडळे आणि रहिवाशांना सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आणि त्याऐवजी कापड व कागद यांसारख्या पुनर्वापरयोग्य साहित्याचा (eco friendly) वापर करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच, ध्वनीची पातळी मर्यादेत ठेवणे आणि लेझर लाईट्सचा वापर टाळणे, अशा सूचना आयोजकांना देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत 22 पारंपरिक विसर्जन स्थळे आहेत.
गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी, एकाच ठिकाणी होणारी मोठी गर्दी टाळण्यासाठी आणि नैसर्गिक जलस्रोतांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी अलीकडच्या काळात कृत्रिम कुंड सुरू करण्यात आले आहेत.
पारंपरिक आणि कृत्रिम अशा दोन्ही विसर्जन स्थळांवर स्वयंसेवक, जीवरक्षक, अग्निशमन कर्मचारी, वीजपुरवठा, सीसीटीव्ही देखरेख, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि निर्माल्य संकलन व वाहतूक यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रशासनाने सांगितले.
तसेच, राफ्ट्स (तरंगणारी साधने) आणि फोर्कलिफ्ट्स यांसारखी उपकरणेही तैनात केली जातील.
नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) सांगितले आहे की, गणेश मंडप उभारण्याची परवानगी 'सिंगल-विंडो' ऑनलाइन ई-सेवेद्वारे दिली जात असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
नागरिकांनी शक्यतो मूर्तीचे विसर्जन घरी किंवा जवळच्या कृत्रिम विसर्जन तलावात करावे आणि हा उत्सव पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
हेही वाचा
