Advertisement

मुंबई विमानतळावरून दररोज १०० विमानांची वाहतूक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली आहे.

मुंबई विमानतळावरून दररोज १०० विमानांची वाहतूक
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेप्रमाणं विमान सेवाही बंद ठेवण्यात आली होती. मात्र, कालांतरानं ही सेवा पून्हा सुरू करण्यात आली आहे. देशांतर्गत ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती. परंतु, हळुहळू मुंबईत अनेक सुविधा, कंपन्या सुरू होत असल्यानं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज १०० देशांतर्गत विमानांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली आहे.

मंगळवारपासून विमानतळावर ५० विमानांचं आगमन व ५० विमानांचं उड्डाण होणार आहे. सध्या मुंबई विमानतळावरून दररोज ५० विमानांची वाहतूक केली जात आहे. त्यामध्ये विमानतळावर येणाऱ्या २५ विमानांचा व विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या २५ विमानांचा समावेश आहे. ही संख्या दुप्पट केल्याने विमान प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईतून देशाच्या विविध १५ सेक्टरमध्ये सध्या देशांतर्गत हवाई प्रवास सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यामध्येही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत सोमवारी मोठी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५८ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जून रोजी ६० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १४ जून रोजी एकूण ७९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

सोमवारी मुंबईत कोरोनाचे १०६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५९ हजार २०१ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  कोरोनाचे ३१३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३० हजार १२५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

लोकलनं पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रवास

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा