‘व्हिडिओकॉन’चे संचालक वेणुगोपाल धूत यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयने दाखल केला गुन्हा

करताना धूत यांनी स्टेट बँक आँफ इंडिया बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशीधरून गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे.

‘व्हिडिओकॉन’चे संचालक वेणुगोपाल धूत यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयने दाखल केला गुन्हा
SHARES

आफ्रिका खंडातील देश मोझांबिक मधील गॅस, इंधन साठ्याच्या अधिग्रहणात अनियमितता आढळून आल्याने व्हिडिओकाॅन कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक वेणूगोपाल धूत यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाने गुन्हा दाखल केला आहे. धूत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत कारवाईचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा:- salon and beauty parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती

विडिओकॉन हायड्रोकार्बन होल्डिंग लिमिटेड (व्हीएचएचएल) या कंपनीने व्हीडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड (व्हीआयएल) च्या मालकीच्या कंपनीने २००८ मध्ये मोझांबिकच्या ऑईल अँड गॅस ब्लॉक (रोव्हुमा एरिया १ ब्लॉक) मध्ये १० टक्के 'पार्टिसिडींग इंटरेस्ट' विकत घेतले. हे प्रकल्प विकत घेण्यासाठी वेणू यांनी स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. हे कर्ज वेणू हे फेडू न शकल्यामुळे बँकांनी हे प्रकल्प ताब्यात घेतले. या प्रक्रियेत बँकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. हा व्यवहार करताना धूत यांनी कर्ज मिळवण्यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांना हाताशीधरून गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. या पूर्वी ही  आयसीआयसीआय बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात धूप यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील कार्यालयावर छापे टाकले होते.

हेही वाचाः- Ramdev Baba : पतंजलीला नोटीस, आयुष मंत्रालयानं उचललं 'हे' कडक पाऊल

दरम्यान, आयसीआयआय-व्हिडिओकॉन प्रकरणात ईडीने व्हिडिओकॉनच्या मुंबई व औरंगाबाद येथील काही ठिकाणांवर छापे टाकले होते. याप्रकरणी वेणुगोपाल धूत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनी लॉंडरिंग प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्यासह ईडीने धूत यांचीही चौकशी केली होती. आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन समूहाला १८७५ कोटींचं कर्ज मंजूर करताना त्यात भष्टाचार झाल्याचा तसेच अनियमितता असल्याचाही आरोप आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावरच ईडीने हा गुन्हा दाखल केला होता.


Read this story in हिंदी
संबंधित विषय