Advertisement

salon and beauty parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती

राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती राज्याचे भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

salon and beauty parlor: सलून, ब्युटी पार्लर लवकरच सुरू करणार, ‘या’ मंत्र्याने दिली माहिती
SHARES

कोरोना संकट आणि लाॅकडाऊनमुळे राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर अजूनही बंदच असल्याने नाभिक समाजाचे मोठे हाल सुरू आहेत. याची दखल घेत लवकरच राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर सुरू (maharashtra government will take decision to open barber shop salon and beauty parlor says vijay wadettiwar) करण्याचा निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती राज्याचे भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. वडेट्टीवार म्हणाले. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील लाॅकडाऊन हळुहळू शिथिल करण्यात येत आहे. कोरोनाची स्थिती पाहता अद्याप सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. यामुळे राज्यभरातील नाभिक समाजाला आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे लवकरच सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली असून येत्या आठवडाभरात सरकार निर्णय घेऊ शकतं. परंतु सलून सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनासंदर्भातील इतर अटींचं काटेकोर पालन करावं लागेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा- तरच, सलून व्यवसायाला परवानगी देऊ- छगन भुजबळ

मागील ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे नाभिक समाजाचा सलून/ ब्युटी पार्लर व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे खूप हाल होत आहे. हाताखाली काम करणाऱ्या कारागिरांना देण्यासही त्यांच्याकडे पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे कारागिरांच्या हातालाही काम उरलेलं नाही. कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात सरकारच्या नियमांचं पालन करून महाराष्ट्रातील तमाम सलून चालक, मालक, कारागिरांनी आपापली, दुकाने-व्यवसाय बंद ठेवला. परंतु राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ लाॅकडाऊन शिथिल करताना नाभिक समाजाच्या व्यवसायाकडे पूर्णत: दुर्लक्ष केलं.

राज्यात जवळपास इतर सर्वच दुकाने सुरू झाली आहेत. तिथं सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पूर्णपणे उल्लंघन होताना दिसत आहे. तरीही सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याउलट सर्व खबरदारी घेऊन व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक सलून मालक-चालकांना अजूनही दुकान उघडण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे सलून, पार्लरची दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी तसंच या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी पॅकेज द्यावं, अशी मागणी या व्यावसायिकांकडून सातत्याने होत आहे. त्याची दखल सरकारने घेतली आहे.

हेही वाचा- नाभिक, धोबी समाजाला आर्थिक पॅकेज द्या, विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा