धक्कादायक! कोरोनाला कंटाळून सेव्हन हिल रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

कोरोनाचा अहवाल पाँझीटिव्ह आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक मानसिक तणावाखाली गेला होता. त्याला उपचारासाठी कोविड स्पेशल रुग्णालय म्हणून नव्याने सुरु करण्यात आलेल्या सेव्हन हिल रुग्णालयाच्या 9 व्या माळ्यावर ठेवले होते.

धक्कादायक!  कोरोनाला कंटाळून सेव्हन हिल रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या
SHARES
मुंबईच्या सेव्हन हिल रुग्णालयात एका 60 वर्षीय कोरोनाबाधित ज्येष्ठ व्यक्तीने रुग्णालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विक्रोळी पूर्व परिसरात राहणाऱ्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी ञास होत होता. त्याने तापसणी केली असता. त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोनाचा अहवाल पाँझीटिव्ह आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक मानसिक तणावाखाली गेला होता. त्याला उपचारासाठी कोविड स्पेशल रुग्णालय म्हणून नव्याने सुरु करण्यात आलेल्या सेव्हन हिल रुग्णालयाच्या 9 व्या माळ्यावर ठेवले होते.
सभोवताली कोरोनाचे रुग्णपाहून तो आणखी खचला गेल्याचे बोलले जाते. याच मानसिकतेतून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


या जेष्ठ नागरिकाने दुपारी 12.45 वा रुग्णालयातील खोलीतील लोखंडी राँडला पँन्टच्या सहायाने गळफास घेतला. तपासणीसाठी कालांतराने त्या ठिकाणी रुग्णालयातील कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, मुंबईत मागील 48 तासात कोरोनाचे 50 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर मुंबईत शुक्रवारी दिवसभरात 748 नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावशक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 462 वर जाऊन पोहचला आहे.
 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा