मुंबईत दररोज तयार होणारा लाखो टन कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकला जातो. त्यात असंख्य टाकाऊ वस्तूंसोबतच गाड्यांच्या स्पेअर पार्टचाही मोठ्या प्रमाणात सामावेश असतो. या स्पेअर पार्टच्या पुनर्वापरातून उपयोगात येतील अशा अनेक वस्तूंचे उत्पादन केले जाऊ शकते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फोर्ड या नामांकीत कार उत्पादक कंपनीने 'स्पेअर पार्ट्स'पासून गणरायाची मूर्ती साकारून रिसायकलिंगला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.
गाड्यांचे डिस्क ब्रेक, स्पेंडर, स्पार्क प्लग आणि क्लच प्लेटचा वापर करून ६.५ फूट उंचीची गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे. फोर्डच्या वर्कशॉप क्यूमधील माधवी खैतान यांनी ही मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये प्रेक्षकांना बघण्यासाठी नुकतीच ठेवण्यात आली होती.
ही मूर्ती अतिशय कल्पकतेने साकारण्यात आली आहे. या मूर्तीद्वारे आम्ही वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अस्सल स्पेअर पार्ट्स वापरण्याचे महत्त्व पटवून देत आहोत.
- सौरभ मखिजा, महाव्यवस्थापक (विक्री विभाग), फोर्ड इंडिया
या अनोख्या मूर्तीबद्दल वर्कशॉप क्यूमधील माधवी पिट्टी म्हणाल्या की, एक हरित उत्पादन डिझाइन कंपनी म्हणून आम्ही शहरातील रस्त्यांवर, घरे आणि कंपन्यांमधून फेकण्यात येण्यात वस्तू तसेच साहित्यावर प्रयोग करतो. त्यानुसार ऑटो स्पेअर पार्ट्सपासून देखील आम्ही नाविन्यपूर्ण वस्तूंच्या उत्पादनाला प्राधान्य देत आहोत.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)