नवरात्रौत्सव २०१९ : मुंबईची महाकालीमाता काळबादेवी

n
n
  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

नवरात्रौत्सवात मुंबईतल्या एकूण एक देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं हे प्रत्येकालाच शक्य नसतं. पण आमच्या 'जागर आदिशक्तीचा' या विशेष कार्यक्रमात ९ दिवस मुंबईतल्या देवींचं दर्शन करता येणार आहे. फक्त दर्शनच नाही तर या मंदिरांचा इतिहास देखील जाणता येणार आहे. तर आज जाणून घेणार आहोत काळबादेवी मंदिराबद्दल...

काळबादेवी

मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध देवीचे मंदिर म्हणून काळबादेवी मंदिराकडं पाहिलं जातं. काळबादेवी परिसरातील कापड मार्केट, झवेरी बाजार अशा मुख्य बाजारपेठेत २२५ वर्ष जुनं काळबादेवी मंदिर आहे. काळबादेवी ही देवी 'महाकालीमाता' या नावानं ओळखली जाते

काळबादेवीचा इतिहास

मुंबईतल्या काळबादेवी परिसरातील मुख्य बाजारपेठेत असलेली ३०० वर्षांपूर्वीची महाकालीमाता काळबादेवी म्हणून ओळखली जाते. मुंबईतील आझाद मैदान परिसरात ३०० वर्षापूर्वी श्री. रघुनाथ कृष्ण जोशी यांनी देवीची प्रतिस्थापना केली. परंतु, त्यांच्या निधनानंतर ब्रिटिशांच्या दबावामुळे हे मंदिर काळबादेवी परिसरात हलवण्यात आलं. मंदिरातील देवीची आणि मंदिराची व्यवस्था जोशी घराण्याची सातवी पिढी पाहत आहे. देवीच्या मंदिरात महालक्ष्मी आणि श्रीसरस्वती देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे

मंदिरानं साधेपणा जपला

काळबादेवी मंदिरात नवरात्रोत्सव साधेपणानं साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात मोठा गाजावाजा नसला तरी धार्मिक विधीवत पूजा केली जाते. नवरात्रीत नवमीला कोहळा कापण्याची प्रथा असून यादिवशी हवन केले जाते. काळबादेवीला मांसाहारी नैवैद्य चालत नाही. परंपरेनुसार धार्मिक विधीवत पूजा केली जातेमार्गशीर्षात कृष्ण पक्षातील अमावस्येला काळबादेवीची मोठी जत्रा भरते. काळबादेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते.


हेही वाचा

नवरात्रौत्सव २०१९ : मुंबईची ग्रामदैवत मुंबादेवी

नवरात्रौत्सव २०१९ : यंदा उपवासात 'या' पदार्थांचा समावेश करा


पुढील बातमी
इतर बातम्या