नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली असून, या दिवसात अनेकजण उपवास धरतात. शरीर आणि मनाच्या शुध्दीकरणासाठी तसंच देवीची उर्जा प्राप्त करण्यासाठी काहीजण सर्व नऊ दिवस, तर काही जण जमतील तसे उपवास धरतात. प्रत्येक समाजाचे नवरात्रीसाठीच्या उपवासाचे नियम वेगळे असतात. पौष्टिक आणि हलका आहार हा उपासामागील समान हेतू आहे. प्रामुख्यानं साबुदाणा, शिंगाडा पीठ, शेंगदाणे, सैंधव मीठ आणि राजगिरा इत्यादी साहित्यांचा उपवासाचे पदार्थ बनवताना वापर करण्यात येतो. तुम्ही अथवा तुमच्या घरातील अन्य सदस्य उपवास धरणार असाल तर या दिवसांसाठी उपवासाच्या खास पाककृती.
भांड्यात एक कप शिंगाड्याचं पीठ घ्या. त्यात १/४ कप भगीरीचे पीठ, १ हिरव्या मिरचीचा ठेचा, १/२ कप दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ हे सगळं एकत्र मिक्स करा. हे मिश्रण १० मिनिटं तसंच ठेवावे.
ढोकळ्याच्या साच्याला थोडेसे तेल लावून त्यात मिश्रण घालावे.
हे मिश्रण १० ते १५ मिनिटं वाफवून घ्यावे.
थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा.
उपवासाच्या चटणीबरोबर फराळी ढोकळ्याचा आस्वाद घ्या.
१ कप राजगिराच्या पीठात २ उकडून बारीक केलेले बटाटे, २ हिरव्या मिरच्यांचा ठेचा, १ टी स्पून जिरे पावडर, कोथिंबीर आणि सैंधव मीठ एकत्र करून गरजेपुरते पाणी घालून पीठ मळून घ्या.
पिठाचे लहान लहान गोळे करून लाटून घ्या. तव्यावर तूप सोडून पराठे दोन्ही बाजूनं चांगले भाजून घ्या. दहीसोबत तुम्ही या पराठ्यांचा आस्वाद घेऊ शकता.
३ कप शिंगाड्याच्या पीठात बारीक चिरलेली १ हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे जिरे पूड, सैंधव मीठ आणि तूप हे सर्व मिक्स करा.
त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. नॉन स्टिक तव्यावर डोस्यासारखे घावन पसरवून घ्या. तेल घालून दोन्ही बाजूनं भाजून घ्या.
२ बटाट्यांची सालं काढून जाडसर किस करून घ्या. हा किस पाच मिनिटं गार पाण्यात ठेवा. त्यानंतर तीन वेळा तरी किस पाण्यानं धुवून घ्या. धुतल्यानंतर तो चांगल्या प्रकारे पिळून घेणे. कढईत तेल गरम करून घेणे.
त्यात जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे नंतर त्यात बटाट्याचा किस घाला.
बटाट्याचा किस साधारण शिजल्यावर दाण्याचं कूट घालून थोडावेळ परतावे.
शेवटी मीठ घालावे आणि गरमागरम खाण्यास घ्यावे.
रताळी स्वच्छ धुवून साली काढून किसून घ्यावीत. कढईत तूप घालून त्यात काजू, बदाम तळून घ्या. त्याच तुपात रताळ्याचा किस घाला आणि २ ते ३ मिनिटं परतून घ्या. नंतर त्यात दूध घाला आणि मंद आचेवर उकळी काढून घ्या.
दहा मिनिटं मंद आचेवर मिश्रण शिजवून घ्या. मिश्रण घट्ट झाले की त्यात साखर घालून मिश्रण हलवून घ्या. त्यात वेलची पूड टाकून ५ मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्या. गॅस बंद करून त्यात आधी तळलेले काजू आणि बदाम टाकावेत.