एसटी बसस्थानकावर आता दिवाळीच्या फराळाचा 'स्टँड'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

दिवाळीच्या वस्तू आणि फराळाची अल्प दराने विक्री करणाऱ्या महिला बचत गटाला हक्काची बाजारपेठ देण्यासाठी एसटी महामंडळाने त्यांना प्रत्येक बसस्थानकावर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नामात्र १ रुपये इतक्या भाडेतत्वावर महिला बचत गटांना ही जागा देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

दिवाळीच्या सुट्टीत मोठ्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावी आणि नातेवाईकांकडे निघतात. जाताना फराळी वस्तू तसेच दिवाळीसाठी लागणाऱ्या इतर वस्तूही घेऊन निघतात. या वस्तू जर त्यांना एसटी स्थानकावरच उपलब्ध झाल्या, तर प्रवासाच्या दृष्टीनेही सोयीचे ठरू शकते.

दर्जेदार वस्तू कमी किंमत

त्याशिवाय महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू आणि फराळ स्वस्त आणि दर्जेदार असतात. त्यामुळेच महिला बचत गटाच्या वस्तूंना मोठी मागणी असते. परंतु दिवाळीच्या काळात त्यांना आपल्या वस्तू विकण्यास पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. शिवाय इतर दुकानदारांच्या स्पर्धेलाही तोंड द्यावे लागते. अशा वेळी बसस्थानकांच्या ठिकाणी बचत गटांना जागा उपलब्ध करुन दिल्यास त्यांना सहज ग्राहक उपलब्ध होउन विक्रीला प्रोत्साहन मिळेल, असे म्हटले जात आहे.

प्रवासास सोयीचे

ग्राहकालाही गावी जाताना दिवाळीच्या वस्तू आणि फराळ घेउन एसटी प्रवास करणे शक्य होईल, या हेतूने अनेक महिला बचत गटांनी एसटी महामंडळाकडे दिवाळीचा फराळ आणि वस्तू विकण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. याच अनुषंगाने महामडंळाने 'दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान' ही योजना आखली आहे.

जागेसाठी इथे करता येईल अर्ज

प्रत्येक बसस्थानकावर जागेच्या उपलब्धतेनुसार १०० चौ. फुटांचे १ दालन याप्रमाणे ५ दालने प्रत्येकी १ रु शुल्क आकारुन देण्यात येतील. अर्जदार महिला बचत गटांना ८ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येतील. तर अर्जाची मुदत २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१७ पर्यंत असणार आहे.


हेही वाचा -

दिवाळीत एसटी चाकरमान्यांच्या खिशाला कात्री


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

पुढील बातमी
इतर बातम्या