Advertisement

दिवाळीत एसटी चाकरमान्यांच्या खिशाला कात्री


दिवाळीत एसटी चाकरमान्यांच्या खिशाला कात्री
SHARES

एसटी तोट्यात जात असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे एसटीला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी प्रशासन वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवत आहे. पण यामुळे प्रवाशांच्या खिशालाही कात्री बसण्याची चिन्हे आहेत. कारण एसटी महामंडळाने दिवाळीत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे समजते. १४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जादा भाडे द्यावे लागण्याची शक्यता आहे.



भाड्यातून महसूलवाढ

दिवाळीला अवघा एक महिना उरला असून सुट्टीच्या दिवशी चाकरमानी आपआपल्या गावी जाणे पसंत करतात. म्हणून चाकरमानी एक महिन्यापूर्वीच जागांसाठी आरक्षण करतात. त्यातच तिकीट आरक्षण केंद्रावर जादा भाडे आकारणीला सुरुवात झाल्याने चाकरमान्यांच्या खिशाला खार बसत आहे. हंगामानुसार बसचे भाडे ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार एसटी महामंडळाचा असतो, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन निगम यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाकडून दिवाळीत भाडेवाढ केली जाते. मागील काही वर्षांपासून भाडेवाढीची ही नवी पद्धत एसटीने सुरू केली आहे. त्यावर वारंवार टीका करण्यात आली असली, तरी शेकडो कोटी रुपये तोट्यात असलेल्या एसटीला या भाडेवाढीतून काही प्रमाणात महसूलवाढ मिळते. एसटीला नफा होत असल्याने एसटी प्रशासन हा भाडे वाढीचा निर्णय घेते. यापूर्वी  एसटी प्रशासनाने दोनदा भाडेवाढ केली होती.


१० ते १५ टक्के भाडेवाढीची शक्यता  

साधी बस आणि रातराणीमध्ये १० टक्के, निमआराम बस सेवांसाठी १५ टक्के आणि वातानुकूलित बससाठी २० टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाने चांगल्या महसूलाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी दिवाळीत केलेल्या भाडेवाढीमुळे ३६ कोटी रुपये, तर त्याआधीच्या वर्षी ४२ कोटी रुपये महसूल एसटीला मिळाला होता.  



हेही वाचा - 

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा 'एसटी'ला फटका



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा