एसटीच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद

  Mumbai
  एसटीच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद
  मुंबई  -  

  गणेशोत्सव जवळ येत आहे. रेल्वेचे आरक्षण फुल झाल्याने एसटीने कोकणात जाणाऱ्या 2216 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. पण आता एसटीला तोटा होत असल्याने पर्याय म्हणून 60 टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी असलेल्या एसटीच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.

  प्रवाशांना गावात पोहोचवणारे एसटी महामंडळ तोट्यात सापडल्यामुळे विविध पर्यायांची चाचपणी महामंडळाकडून करण्यात येत आहे. मात्र, याकरता लांब आणि मध्यम लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांचा बळी दिला जात असून या फेऱ्यांना थेट प्रवासी मिळत नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.

  गेल्या काही वर्षांपासून खासगी वाहने वाढली आहेत. त्यामुळे प्रवाशांचा एसटीकडे कल कमी झाला आहे. लांब पल्ला गाठण्यासाठी प्रवासी स्वस्त आणि आरामदायी पर्याय म्हणून रेल्वेला प्रथम पसंती देत आहेत. घटती प्रवासी संख्या, देखभाल-दुरुस्तीसह अन्य खर्चात झालेली वाढ यामुळे महामंडळाला सध्या मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
  परिणामी दिवसेंदिवस वाढत जाणारा तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  हेही वाचा -  

  कोकणरेल्वे हाऊसफुल्ल, चाकरमान्यांची तिकिटासाठी धावपळ

  गणेशोत्सवासाठी 'परे' च्या विशेष गाड्या


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.