Advertisement

कोकणरेल्वे हाऊसफुल्ल, चाकरमान्यांची तिकिटासाठी धावपळ


कोकणरेल्वे हाऊसफुल्ल, चाकरमान्यांची तिकिटासाठी धावपळ
SHARES

गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर आला असताना आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी चाकरमानी कोकणात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता रेल्वचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. पण काळजी नको, कारण आता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळ पुढे सरसावले आहे. गणेशोत्सवासाठी 2216 जादा गाड्या चालवण्यात येणार आहेत. परिणामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना एसटीचे तिकीट मिळणार आहे.

या जादा वाहतुकीसाठी 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महामार्गावर काही ठिकाणी वाहन दुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरती प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.


अधिक माहितीसाठी या क्रमांकांवर संपर्क साधा


गणेशोत्सवासाठी चालवण्यात येणाऱ्या जादा वाहतुकीसंदर्भात अधिक माहितीसाठी एसटीच्या 1800221250 या टोल फ्री क्रमांकावर अथवा नजिकच्या एसटी आगारात प्रवाशांनी संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई-ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटी महामंडळातर्फे यंदा 2 हजार 216 बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी 2010 जादा बसेस गणेशोत्सवादरम्यान चालवण्यात आल्या होत्या. यंदा चालवण्यात येणाऱ्या जादा बसेसचे संगणकीय आरक्षण येत्या 22 जुर्लेपासून सुरू होणार आहे. तसेच ग्रुप बुकिंगला 15 जुर्ले पासून सुरुवात झाली आहे. परतीच्या प्रवासासाठी ग्रुप बुकिंग 23 जुलैपासून सुरू होणार आहे.


रेल्वे फुल्ल

कोकण मार्गावर जाणाऱ्या नियमित गाड्यांमधील तिकीट आरक्षण फुल्ल झाल्याने प्रतीक्षा यादीतील सुमारे 13 हजार प्रवाशांना वाहतुकीचा अन्य पर्याय निवडावा लागणार आहे. कोकण मार्गावर 21 ते 25 ऑगस्ट या कालावधीत नियमित गाड्यांमधील प्रतीक्षा यादीची ही स्थिती आहे. या गाड्यांमधील आरक्षित तिकीटे रद्द होण्याचे प्रमाण अल्प राहणार असल्याने इतर प्रवाशांना जादा फेऱ्या वा इतर पर्याय शोधावे लागणार आहेत.

यंदाच्या वर्षी प्रतीक्षायादीतील एकूण प्रवाशांची संख्या 13 हजार 306 इतकी आहे. अनेकदा आरक्षित तिकिटे ऐनवेळी रद्द होण्याचे प्रमाण जास्त असते. पण सणासुदीच्या दिवसात आरक्षित तिकिटे रद्द न करण्याकडे कल असतो. मात्र, तरीही या गाड्यांचे आरक्षित तिकीट मिळेल या आशेवर असणाऱ्या शेकडो प्रवाशांनी आपली तिकिटे रद्द केलेली नाहीत.


श्रेणी/गाड्यांच्या प्रतीक्षायादीतील प्रवासी संख्या

  • स्लीपर क्लास - 9,388
  • थर्ड एसी - 2,238
  • सेकंड एसी - 957
  • जनशताब्दी - (चेअरकार) 98
  • डबलडेकर - 287
  • तेजस - 151
  • एक्झिक्युटिव्ह श्रेणी - 29



हेही वाचा -

चाकरमान्यांचा गणेशोत्सव गाडीतच साजरा होणार?

एसटीचे तिकीट दाखवा ३० रुपयांत नाश्ता करा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा