Advertisement

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या 'या' स्पेशल गाड्या!


गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या 'या' स्पेशल गाड्या!
SHARES

दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यंदा गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपल्याने चाकरमान्यांप्रमाणेच रेल्वे प्रशासन देखील सज्ज होऊ लागले आहे.

यंदा गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 142 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये आता 60 जादा गाड्यांची भर पडणार आहे. या गाड्या मुंबई ते चिपळूण, एलटीटी ते करमाली आणि पनवेल ते सावंतवाडी दरम्यान धावणार आहेत. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.


मुंबई-चिपळूण स्पेशल ट्रेन 

  • गाडी क्रमांक - 01179-01180
  • कधी धावणार - 20 अॉगस्ट ते 12 सप्टेंबर पर्यंत (22 फेऱ्या), मंगळवार, गुरुवार आणि रविवार
  • किती वाजता - पहाटे 5 वाजता सुटणार
  • कधी पोहोचणार - चिपळूणला सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी पोहोचणार

या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, करंजेवाडी, खेड या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या गाडीला सेकण्ड सिटिंगचे 6 आणि जनरल सेकण्ड क्लासचे 6 कोच असणार आहेत.


चिपळूण-मुंबई स्पेशल ट्रेन 

  • गाडी क्रमांक - 01179-01180
  • कधी धावणार - मंगळवार, गुरुवार आणि रविवार
  • किती वाजता - संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी सुटणार
  • कधी पोहोचणार - मुंबईला रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी पोहचणार


लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 01045-01046 (6 फेऱ्या)
  • कधी धावणार - 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, दर सोमवारी
  • किती वाजता - मध्यरात्री 1 वाजून 10 मिनिटांनी सुटणार
  • कधी पोहोचणार - करमाळीला सकाळी 11 वाजता पोहचणार

या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या ट्रेनला एसी टू टायरचा एक कोच, एसी थ्री टायरचे 3, स्लीपर क्लासचे 8 आणि जनरल सेकण्ड क्लासचे 6 कोच असणार आहे.


करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 01045-01046 (6 फेऱ्या)
  • कधी धावणार - दर शुक्रवारी
  • किती वाजता - दुपारी 1 वाजता सुटणार
  • कधी पोहोचणार - एलटीटीला रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी पोहचणार


पनवेल-सावंतवाडी स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 01189-01190 (8 फेऱ्या)
  • कधी धावणार - 19 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर, दर शनिवारी
  • किती वाजता - संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी पनवेलहून सुटणार
  • कधी पोहोचणार - सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी पोहचणार


सावंतवाडी-पनवेल स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 01189-01190 (8 फेऱ्या)
  • कधी धावणार - दर शनिवारी
  • किती वाजता - सकाळी 8 वाजता सावंतवाडीहून ट्रेन सुटणार
  • कधी पोहोचणार - संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी पनवेलला पोहचणार


पनवेल-सावंतवाडी स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 01191-011192 (8 फेऱ्या)
  • कधी धावणार - 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर, दर शनिवारी
  • किती वाजता - संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी पनवेलहून सुटणार
  • कधी पोहोचणार - सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी पोहचणार

या ट्रेनला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झराप या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या ट्रेनला सेकण्ड क्लास सिटिंगचे 10 आणि जनरल सेकण्ड क्लासचे 8 कोच असणार आहेत.


सावंतवाडी-पनवेल स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 01191-011192 (8 फेऱ्या)
  • कधी धावणार - दर शनिवारी 
  • किती वाजता - सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी सावंतवाडीहून ट्रेन सुटणार
  • कधी पोहोचणार - संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी पनवेलला पोहचणार




हे देखील वाचा - 

उद्धव ठाकरे म्हणतात 'आधी गणेशोत्सव नंतर कायदा...'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा