Advertisement

गणेशोत्सवासाठी कोकणात धावणार 142 स्पेशल ट्रेन


गणेशोत्सवासाठी कोकणात धावणार 142 स्पेशल ट्रेन
SHARES

चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने कोकणात जातात. गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर येउन ठेपल्यामुळे चाकरमान्यांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासनही सज्ज होऊ लागले आहे. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 142 स्पेशल ट्रेन चालविण्याचा विचार केला आहे. सीएसटी, एलटीटी, दादर व पुणे ते करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी दरम्यान या स्पेशल ट्रेन धावतील. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय होणार आहे.

अशा असतील ट्रेन -

  • 01187 लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी एसी डबलडेकर ट्रेन 22 आॅगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान दर मंगळवारी पहाटे 5 वाजून 33 मिनिटांनी सुटणार आहे. ही ट्रेन रत्नागिरीला दुपारी 1 वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी 01188 रत्नागिरी- ते लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुटेल. ही ट्रेन एलटीटीला रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. या ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळून, सावर्डे, अरवली रोड आणि संगमेश्वर या स्थानकात थांबा देण्यात येईल.

  • 01445 सीएसटी - करमाळी स्पेशल ट्रेन (24 फेऱ्या-वन वे) 18 आगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान दररोज रात्री 12 वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून करमाळीला दुपारी 2 वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल. या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळून, सावर्डे, अरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदूर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी, मडुरे आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येईल.

  • याशिवाय 01113-01114 दादर- सावंतवाडी स्पेशल (24 फेऱ्या, आठवड्यातून तीन वेळा) ट्रेन 18 आगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी सुटणार असून सावंतवाडीला रात्री 7 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी सावंतवाडीहून सुटलेली ट्रेन दादरला दुपारी 4 वाजता पोहोचेल.

  • 01185 दादर-रत्नागिरी स्पेशल ट्रेन 18 आगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान दर शुक्रवारी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून रत्नागिरीला पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी पोहचणार आहे. 01037 एलटीटी-सावंतवाडी एसी स्पेशल ट्रेन 24 आगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून सावंतवाडीला दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पोहोचणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा