Advertisement

उद्धव ठाकरे म्हणतात 'आधी गणेशोत्सव नंतर कायदा...'


उद्धव ठाकरे म्हणतात 'आधी गणेशोत्सव नंतर कायदा...'
SHARES

'गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या मोठ्या आवाजाविरोधात नेहमीच पर्यावरणवादी आक्षेप घेत असतात. मात्र गणेशोत्सव आधीपासून आहे, कायदे नंतर आलेत' अशी भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. 

'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे की, जनता कायद्यासाठी नाही, तर कायदे हे जनतेसाठी आहेत. गणेशोत्सव हे पूर्वीपासून सुरू आहेत. पण ते सुरू असताना त्याच्या आजूबाजूला मंदिर येतं, इमारती येतात, हॉस्पिटल येते. ते आल्यानंतर मग कायदे केले जातात आणि मग या कायद्यांमुळे गंडांतर गणेशोत्सवावर येते. 

मग असा कायदा करा की, जिथे पूर्वीपासून गणेशोत्सव सुरू आहे, त्याच्या आजूबाजूला अशा इमारती येऊच देऊ नकाट, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.


गणेशोत्सव दणक्यात साजरा होणारच!

सायलेन्ट झोन असो की अन्य कोणताही कायदा, त्याचा बागुलबुवा करू नका. कायदे नंतर आलेत, गणेशोत्सव पूर्वीपासून आहे. तेव्हा सरकारने यावर कायमस्वरुपी तोडागा न काढल्यास शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठिशी आहे. गणेशोत्सव दणक्यात साजरा करणारच, असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.


हिंदूंचे सण आले की वातावरण तापते

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असो कि दिवाळी, हे हिंदूंचे सण आले की वातावरण तापू लागते. कायदे आडवे येतात, रेड अलर्ट जारी होतो, अतिरेकी हल्ल्याच्या सूचना येतात. अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन सण साजरे करणाऱ्या हिंदूंवरच कायद्याचा बडगा उगारला जातो. यावर सरकार कायमस्वरुपी तोडगा का काढत नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.


उत्सव साजरे करणारे अतिरेकी आहेत का?

हे उत्सव साजरे करणारे अतिरेकी आहेत का? जर तुम्ही जम्मू-कश्मीरमधील अतिरेक्यांशी चर्चा करता तर गणेशोत्सव मंडळांशी का नाही? ते अतिरेकी नाहीत. त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. जे काही चुकीचे आहे ते त्यांना समजावून सांगा. जनतेला त्रास देणे हा गणेशोत्सव मंडळांचा हेतू नसल्याचंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.



मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणाच्या कारणाखाली गणेश मंडळांवर पोलिस कारवाई केली जाते. एकप्रकारे हा उत्सव साजरी करणारी मंडळे आणि भाविकांवरील अन्यायच आहे. त्यामुळे सरकारने गणेशोत्सवादरम्यान कुठल्याही मंडळावर कारवाई होणार नाही, यासाठी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यासाठी आ. अनिल परब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. 



हे देखील वाचा

शांतता क्षेत्रांमध्ये गणेशोत्सव साजरा होणारच : समन्वय समितीचा निर्धार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा