Advertisement

गणेशोत्सव..सण की नैसर्गिक आपत्ती !


गणेशोत्सव..सण की नैसर्गिक आपत्ती !
SHARES

परमेश्वर कधीही कुठूनही येत वा जात नाही. तो कायम अस्तित्वात आहे आणि रहाणार आहे. पण आपण देवाच्या आगमनाचे आणि निरोपाचे उत्सव साजरे करतो. गणेशोत्सवही तसाच. जन्म, जीवन आणि मृत्यू या आपल्या जीवनक्रमाचं प्रतिकात्मक दर्शन घडवणारा.
विद्येची देवता असलेल्या गणेशाचा उत्सव आपल्याकडे पूर्ण श्रद्धेने आणि वैभवशाली पद्धतीने साजरा केला जातो. गणपती बाप्पाशी भक्तांची भावनिक नाळ जोडली गेलेली असते. पण यातील विरोधाभास म्हणजे 11 दिवस त्रिकाळ पूजा होणारी बाप्पांची मूर्ती विसर्जनानंतर तुकड्यांमध्ये विखुरलेली दिसून येते. हीच आपली भक्ती म्हणायची का? केवळ 11 दिवस होणारी पूजा म्हणजेच भक्ती म्हणायची का? विसर्जनानंतर गणेशमूर्तींच्या होणा-या दुरवस्थेची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्यातून पर्यावरणाची कधीही भरून न येणारी हानी होते.
समुद्रात फेकले जाणारे निर्माल्य, विसर्जित होणाऱ्या मूर्ती यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची जबाबदारी आपण स्वीकारत नाही. समुद्रात मूर्ती विसर्जित करा वा निर्माल्य, शेवटी त्याचा कचराच होतो. त्यामुळे दिसणारे चित्र हे भेसूर असते. पण अशी एक वेळ येईल जेव्हा निसर्गाकडून आपल्यालाच याची सव्याज परतफेड होईल. हे वास्तव आहे. त्याचा अनुभव आपण केदारनाथ आणि पशुपतीनाथ येथे आलेल्या नैसर्गिक प्रकोपांमध्ये घेतला आहे.
खरंतर भक्तीचा देखावा करण्यापेक्षा ती मनात असणं आणि त्यावर श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. आणि येणा-या पिढीसाठी जग प्रदूषणमुक्त आणि याहून स्वच्छ आणि सुंदर रहाणं जास्त महत्त्वाचं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा