Advertisement

एसटी प्रशासनाला पावला विठोबा


एसटी प्रशासनाला पावला विठोबा
SHARES

आषाढी एकादशीला पंढरपूरला विठोबाच्या भेटीला जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या भाविकांमुळे तोट्यात गेलेल्या एसटीला प्रचंड नफा झाला आहे. आषाढी यात्रेनिमित्त एसटीने चालवलेल्या जादा वाहतुकीमुळे एसटीला तब्बल 16 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून प्रवासी संख्येत देखील 2 लाखांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी तोट्यात सुरु होती. मात्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने एसटीला आर्थिक फायदा झाला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने नियोजन केले होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते, महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते.

3 ते 10 जुलैदरम्यान पंढरपूरसाठी एसटी महामंडळाने 3,527 इतक्या जादा एसटीच्या गाड्या चालवल्या. त्यामुळे वारकऱ्यांना आणि भक्तांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळाला.

महामंडळाकडून जादा बसगाड्यांच्या 16,307 फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यातून महामंडळाला 16 कोटी 52 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यावेळी 7 लाख 31 हजार 806 प्रवाशांनी-भाविकांनी एसटीमधून प्रवास केला.


बसगाड्यांसोबतच वारकऱ्यांसाठीच्या सुविधा

  • माहिती कक्ष
  • विविध ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्रे
  • विश्रांती कक्ष
  • प्रसाधन गृह
  • पिण्याचे पाणी
  • जनरेटर
  • रुग्णवाहिका
  • क्रेन 
  • फिरते शौचालय
हे देखील वाचा - 

आता एसटीचेही कॉल सेंटर्स!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा