आता एसटीचेही कॉल सेंटर्स!

  Mumbai
  आता एसटीचेही कॉल सेंटर्स!
  मुंबई  -  

  एसटीच्या प्रवाशांना दूरध्वनीद्वारे एसटीबद्दलचे वेळापत्रक, आरक्षण, जादा बसेस, विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बाह्य संस्थेद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित माहिती केंद्रे (कॉल सेंटर) सुरू करण्यात येत आहेत.

  एसटी तोट्यात जात असल्याने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी एसटी प्रशासन प्रयत्न करत आहे. प्रवाशांच्या तक्रारी-सूचनांचे तातडीने निरसन व्हावे आणि एसटी सेवा अधिकाधिक प्रवासीभिमुख होण्यासाठी माहिती केंद्रे विकसित होणे अत्यंत आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले.

  सन 2010 मध्ये एसटी प्रशासनामार्फत 1800221250 या निःशुल्क दूरध्वनी क्रमांकाद्वारे एक माहिती केंद्र सुरू करण्यात आले. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे सदर कॉल सेंटर अजूनही प्राथमिक अवस्थेतच सुरू आहे.


  येत्या दोन महिन्यात कॉल सेंटर सुरू होणार

  एसटीतून दररोज सरासरी 66 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांना एसटीच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने साय फ्युचर इंडिया प्रा. लि. या कंपनीशी करार करुन हे कॉल सेंटर सुरू करण्याची योजना आखली. येत्या दोन महिन्यात आधुनिक स्वरुपात आणि प्रशिक्षित मनुष्यबळासह हे कॉल सेंटर सुरू होत आहे.
  हेही वाचा -

  एसटी बस आता मालवाहतूकही करणार

  लाल डबा बदलतोय...प्रवाशांना वायफाय देतोय!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.