लाल डबा बदलतोय...प्रवाशांना वायफाय देतोय!

Mumbai
लाल डबा बदलतोय...प्रवाशांना वायफाय देतोय!
लाल डबा बदलतोय...प्रवाशांना वायफाय देतोय!
See all
मुंबई  -  

आता तुम्ही धावत्या एसटीत बसून युट्युबवरील एखादा आवडता चित्रपट किंवा फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मित्र-मैत्रिणींशी चॅट करू शकणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या रेंजची चिंता करायची गरज राहणार नाही. कारण, एसटी महामंडळाने तब्बल 5900 बसेसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लवकरच रस्ता तिथे एसटी या ब्रीदवाक्याप्रमाणे एसटी तिथे वायफाय हे नवं ब्रीदवाक्य तयार होणार आहे.

एकीकडे एसटी महामंडळ तोट्यात असताना दुसरीकडे विविध माध्यमातून एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत एसटीच्या 5,900 बसमध्ये वायफाय बसवण्यात आले आहे. प्रवाशांनी त्याद्वारे बॉलीवूड चित्रपट पाहण्यास अधिक पसंती दिल्याचे उपलब्ध आकडेवारीनुसार समजत असून येत्या ऑक्‍टोबर 2017 पर्यंत एसटीच्या सर्व बसमध्ये ही सुविधा दिली जाईल असेही सांगण्यात येत आहे.


हेही वाचा - 

एसटी बस आता मालवाहतूकही करणार

आता एसटीच्या बोधचिन्हात 'जय महाराष्ट्र'


सुखकर प्रवासासह प्रवाशांची करमणूक व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये वायफाय सुविधा देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला. त्याचे काम यंत्र मीडिया सोल्यूशन या कंपनीला देण्यात आले. एसटी महामंडळाकडे सध्या 18 हजार बसेस असून लवकरच सर्व बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. या सिस्टिममध्ये निवडक अशा मराठी, हिंदी चित्रपटांसह गाणी, कॉमेडी मालिका असून प्रवासी यातील कोणताही पर्याय निवडून आपल्या मोबाईलवर ते पाहू शकतात. 100 हिंदी चित्रपट, 20 ते 25 मराठी चित्रपट, 20 अन्य भाषिक चित्रपट आणि पाच ते सात मालिकांचा पर्याय प्रवाशांना देण्यात आला आहे.


हेही वाचा

राज्यात एसटीची वातानुकूलित 'शिवशाही' धावणार!

एसटी महामंडळात तब्बल 1285 कर्मचारी सेवानिवृत्त होणार


प्रवाशांनी हिंदी चित्रपटांना अधिक पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ मराठी चित्रपटांसह डब केलेल्या अन्य भाषिक चित्रपटांचा क्रमांक लागतो. एसटी महामंडळाने संबंधित कंपनीशी पाच वर्षांचा करार केला आहे. या कंपनीकडून एसटी महामंडळाला दर वर्षी 1 कोटी 5 लाख रुपये मिळणार आहेत. दिवसाला एका बसच्या प्रत्येक फेरीमागे 10 ते 12 प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत. ऑक्‍टोबरपर्यंत एसटीच्या सर्व बसमध्ये वायफाय हॉटस्पॉट सुविधा दिली जाईल. या सुविधेमुळे प्रवाशांची चांगली करमणूक होत आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.