Advertisement

राज्यात एसटीची वातानुकूलित 'शिवशाही' धावणार!


राज्यात एसटीची वातानुकूलित 'शिवशाही' धावणार!
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित शिवशाही बसचा समावेश करण्यात आला आहे. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासह उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत लवकरच शिवशाहीचे लोकार्पण होणार आहे.संपूर्ण वातानुकूलित 45 आसनी शिवशाही या एसटी बसमध्ये प्रत्येक आसनासाठी एलइडी स्क्रीन आणि गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तसेच स्वतंत्र हेडफोनची सुविधा, वाचन करण्यासाठी अॅडजस्टेबल हेडलँप, पुश-बॅक आसन व्यवस्था करण्यात आली आहे. अशी अलिशान शिवशाही प्रवाशांच्या सेवेत एसटी ताफ्यात तैनात करण्यात आली आहे. आशाच 1 हजार शिवशाही बस हळूहळू प्रवाशांच्या सुविधेत आणण्यात येणार आहेत. अशा 1 हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा प्रक्रियेचा टप्पा पार पडला आहे. उर्वरित पाचशे नवीन बसेस एसटीच्या कारखान्यात तयार करण्यात येणार आहेत. 

खासगी वाहतुकीकडे गेलेल्या एसटीच्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महामंडळाने गेल्या वर्षभरात चांगलीच कंबर कसली आहे आणि प्रवाशांसाठी अनेक सुविधा आणण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वात महत्त्वाची घोषणा आणि मोठा प्रकल्प असलेल्या एसटीच्या एसी शिवशाही बसचाही समावेश होता. राज्यभरातील खासगी वाहतूकदारांकडून एसटी बस गाड्यांच्या तुलनेत आरामदायी बस गाड्यांच्या भाडयात सवलत दिली जाते. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत दिवसागणिक घट होत आहे. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी शिवशाही बस गाड्या टप्प्याटप्प्याने एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

एसटीला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. एसटी बसचे रूपातंर हळूहळू वातानुकुलित बसमध्ये होईल.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा