एसटी बस आता मालवाहतूकही करणार

  Mumbai
  एसटी बस आता मालवाहतूकही करणार
  मुंबई  -  

  ग्रामीण भागात पोहोचणारी एसटी दिवसेंदिवस तोट्यात जात असताना आता एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रवासी वाहतुकीसोबतच बसच्या सहाय्याने मालवाहतूक करण्याचाही परिवहन विभागाचा विचार आहे.

  भारतीय रेल्वेच्या पाठोपाठ आता एसटी महामंडळही माल वाहतुकीला सुरुवात करणार आहे. स्वातंत्र्यानंतर 1948 साली मोटार वाहन कायद्याच्या अनुषंगाने एसटीला मालवाहतूक करण्यासही मुभा देण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत एसटीने माल वाहतुकीला सुरुवात केली नव्हती. एसटीचा कोट्यवधी रुपयांचा तोटा पाहता, नव्या उत्पन्नाचा स्रोत म्हणून एसटी महामंडळ मालवाहतूक चालू करण्याच्या विचारात आहे. दरवर्षी एसटीच्या 1500 गाड्या नादुरुस्त असल्याने भंगारात काढाव्या लागतात. या गाड्यांची रचना बदलून त्या माल वाहतुकीला वापरणे सहज शक्य होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.


  हेही वाचा -

  एसटी अजूनही तोट्यातच!

  राज्यात एसटीची वातानुकूलित 'शिवशाही' धावणार!


  सध्या एसटी महामंडळाचा एकूण तोटा 2300 कोटींचा असून, मागील वर्षी एप्रिल महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा 45 कोटी एवढा होता. यामध्ये यावर्षी आणखी भर पडून हा तोटा एप्रिल महिन्यात अंदाजे 92 कोटींवर पोहोचल्याची माहितीही सूत्रांनी दिली. 1 किलोमीटर मागे 1 रूपया मिळत असून, राज्यभरात दररोज एसटी बसेस सुमारे 57 लाख किलोमीटर धावते. त्यामुळे एसटी महामंडळाला दररोज 57 लाखांचे नुकसान होते. तसेच राज्यातील 250 आगारांत कार्यरत असलेल्या एक लाख कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांवर 3 हजार कोटी वार्षिक खर्च होत आहे. माल वाहतुकीची महत्त्वाकांक्षी सेवा सार्वजनिक-खासगी भागीदारीत (पीपीपी) चालविली जाणार अशीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.