Advertisement

एसटी अजूनही तोट्यातच!


एसटी अजूनही तोट्यातच!
SHARES

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत एसटीने गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. पण यंदा एसटीने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या संख्येत मोठी घट झाली. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत एसटीच्या उत्पन्नात घट झाल्याची माहिती एसटीच्या मंडळाकडून देण्यात आली आहे.

घटत्या प्रवासी संख्येला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. आता आरामदायी वातानुकूलित शिवशाही प्रवांशांच्या सेवेत आणली असतानाही प्रवासी संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. एप्रिल 2016 मध्ये एसटीची प्रवासी भारमान 58 टक्के एवढे होते. 2017 एप्रिल महिन्यात हे भारमान एक टक्क्याने कमी होऊन 57 टक्क्यांपर्यंत घसरले. परिणामी महामंडळाच्या खिशाला कात्री लागली आहे.

सध्या महामंडळाचा एकूण तोटा 2 हजार 300 कोटींच्या घरात असून मागील वर्षी एप्रिल महिन्यात हा तोटा 45 कोटी एवढा होता. यामध्ये यावर्षी आणखी भर पडून हा तोटा एप्रिल महिन्यात अंदाजे 92 कोटींवर पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1 किलोमीटरमागे 1 रुपया मिळत असून राज्यभरात दररोज सुमारे 57 लाख किलोमीटर एवढे अंतर एसटी बसेस धावतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा