Advertisement

गणेशोत्सवासाठी 'परे' च्या विशेष गाड्या


गणेशोत्सवासाठी 'परे' च्या विशेष गाड्या
SHARES

यंदा गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि अहमदाबादहून या स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे.


मुंबई सेंट्रल-मंगलोर स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 09001
  • कधी धावणार - 23 आणि 30 ऑगस्ट
  • किती वाजता - रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी सुटणार
  • ही ट्रेन वसई रोडला रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी पोहचणार
  • कधी पोहचणार - मंगलोरला गुरुवारी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी पोहचणार


मंगलोर-मुंबई सेट्रल स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 09002
  • कधी धावणार - 24 आणि 31 ऑगस्ट
  • किती वाजता - रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सुटणार
  • कधी पोहचणार - मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी पोहचणार

या ट्रेनला एसी टू टायर, एसी थ्री टायर आणि स्लीपर क्लासचे कोच असणार आहेत. ही ट्रेन बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी, मडुरे, थिविम, मडगाव, कारवार, कुम्टा, भटकळ, उडुपी या स्थानकांवर थांबेल.


मुंबई सेंट्रल-मडगाव स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 09007
  • कधी धावणार - 21 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर
  • किती वाजता - दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सुटणार
  • कधी पोहचणार - मडगावला दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी पोहचणार


मडगाव-मुंबई सेट्रल स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 09008
  • कधी धावणार - 22 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबर
  • किती वाजता - दुपारी 5 वाजून 25 मिनिटांनी सुटणार
  • कधी पोहचणार - मुंबई सेंट्रलला दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी पोहचणार

या ट्रेनला एसी टू टायर, एसी थ्री टायर आणि स्लीपर क्लासचे कोच असणार आहेत. ही ट्रेन बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी, मडुरे, थिविम, मडगाव, कारवार या स्थानकांवर थांबेल.
तसेच अहमदाबाद ते करमाळी दरम्यान देखील दहा फेऱ्या चालवण्यात येणार आहे. पंधरा जुर्लेपासून प्रवासी या स्पेशल ट्रेनचे आरक्षण करू शकतात.


वांद्रे टर्मिनस-करमाळी स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 09009
  • कधी धावणार - 20, 25, 27, 29 ऑगस्ट तसेच 1 आणि 3 सप्टेंबर
  • किती वाजता - रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी सुटणार
  • ही ट्रेन वसई रोडला मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी पोहचणार
  • कधी पोहचणार - दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता करमाळीला पोहचणार


करमाळी-वांद्रे टर्मिनस स्पेशल ट्रेन

  • गाडी क्रमांक - 09010
  • कधी धावणार - 21, 23, 26, 28, 30 ऑगस्ट आणि 2 व 4 सप्टेंबर
  • किती वाजता - रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुटणार
  • सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी वसई रोडला पोहचणार
  • कधी पोहचणार - वांद्रे टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी पोहचणार


या ट्रेनला एसी टू टायर, एसी थ्री टायर, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास जनरल कोच असणार आहेत. या ट्रेनला बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी, मडुरे, थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.



हेही वाचा - 

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या 'या' स्पेशल गाड्या!

गणेशोत्सवासाठी कोकणात धावणार 142 स्पेशल ट्रेन



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा