Advertisement

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा 'एसटी'ला फटका


उच्च न्यायालयाच्या आदेशाचा 'एसटी'ला फटका
SHARES

आर्थिक तोटा सहन करत असलेल्या एसटी महामंडळापुढे दादरमधील एसटी स्टँड बंद करण्याची वेळ ओढावली आहे. मुंबईतील उड्डाणपुलाखालील ‘पे अँड पार्क’ योजना बंद करण्याचे आदेश यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशानुसार महापालिकेने ‘पे अँड पार्क’ योजना बंद केली. आता दादर पुलाखाली चालवण्यात येणारे दादरचे एशियाड एसटी स्टँड बंद करण्याची नोटीस एसटी महामंडळाला पाठवण्यात आली आहे.

दादर-एशियाड स्टँड उड्डाणपुलाखाली असल्याने पालिकेच्या उपमुख्य इंजिनिअर (वाहतूक) यांनी एसटीच्या कुर्ला विभाग अधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठवले आहे. त्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत इथल्या स्टँडची जागा निष्कासित करण्यास सांगितले आहे. या पत्राने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.


शिवनेरी बंद झाल्याने प्रवाशी नाराज 

एसटी महामंडळाच्या शिवनेरी सेवेला उच्चभ्रू वर्गाचीही पसंती मिळाली आहे. परंतु या स्टँडच्या अस्तित्वावर पालिकेच्या पत्रामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा स्टँड दादर टी.टी.कडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपुलाखाली आहे. महापालिकेने पर्याय म्हणून ही जागा दिली होती. स्टँड बंद झाल्यास वा अन्यत्र स्थलांतरित झाल्यास हजारो प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. दादर-पुणे मार्गावरील सुपरिचित दादर-पुणे शिवनेरी सेवेसही धक्का बसण्याची शक्यता आहे. 


दररोड १२ हजार प्रवाशांची वर्दळ 

दादर-एशियाड स्टँड हा ‘पे अँड पार्क’ योजनेखाली असून दिवसाला सुमारे १२ हजार प्रवाशांची ये-जा होते. प्रवाशांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या या सेवांमुळे एसटीलाही आर्थिक सहाय्य मिळत आहे. या स्टँडवर दररोज २३६ बसेस ये-जा करतात. त्यासह मुंबई सेंट्रल, परळहून येणाऱ्या बसेसच्या प्रवाशांसाठी हा थांबा आहे. त्यामुळे तो बंद झाल्यास वा अन्यत्र स्थलांतरित झाल्यास वाहतूक सेवेवर परिणाम होणार असून प्रवाशांनाही याचा त्रास होणार आहे. 

दादर-एशियाडची जागा यापूर्वी कोहिनूर टॉवरजवळ होती. त्या बदल्यात महामंडळास उड्डाणपुलाकडील जागा देण्यात आली. ही जागा वापरात येताना झालेल्या करारानुसार एसटीतर्फे महापालिकेस १२.५० लाख रु. जाहीरात आणि ६ लाख रुपये भाडे स्वरुपात दिले जाते. मात्र या पत्रातील मसुद्याची अंमलबजावणी झाल्यास एसटी महामंडळास नुकसान होणार आहे.


हेही वाचा - 

एसटी प्रशासनाला पावला विठोबा

एसटीच्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा