‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ

 Pali Hill
‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ
‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ
‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ
‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ
See all

मुंबई - दरवर्षी नवरात्रोत्सवात महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात दाखल होतात. त्यामुळे एसटी महांडळाने भाविकांच्या सुविधेसाठी यंदा मुंबई ते कोल्हापूर मार्गावर शिवनेरी बससेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र, पहिल्या दोन दिवसात अवघ्या 29 प्रवाशांनी शिवनेरी बसमधून प्रवास केला आहे. तर चार दिवसात जवळपास 30 हजार रुपये एवढेच उत्पन्न एसटीला मिळू शकले आहे.

विशेष म्हणजे या बसचे भाडे प्रत्येकी 1 हजार 43 रुपये असल्याने प्रवासी याकडे फिरकत नसल्याची चर्चा आहे. तर खासगी वाहतुकीचे दर 750 ते 800 रुपये आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून सुविधेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे उघड झाले आहे.

Loading Comments