Advertisement

माहिममध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन


माहिममध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
SHARES

माहिमच्या 'अवर लेडी वेलंकिनी सोसायटी'त वीज बचत आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आला असून या प्रकल्पाचे उद्घाटन स्थानिक नगरसेविकेच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

मुंबईत सर्वत्र कचऱ्याची समस्या गंभीर असताना 'अवर लेडी वेलंकिनी' इमारतीतील रहिवाशांनी सर्वांपुढे नवा आदर्श ठेवत सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्पही येथे सुरू केला आहे. इतर सोसायटींनीही या उपक्रमाचे अनुकरण करण्याची गरज आहे. तसे झाल्यास भविष्यात उत्तम दर्जाच्या खतनिर्मितीसोबतच मुंबईतून कचऱ्याची समस्या हद्दपार होऊ शकते, असे मत सोसायटीतील सदस्य इम्युनियल डिसिल्व्हा यांनी व्यक्त केले. इमारतीत लवकरच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

'अवर लेडी वेलंकिनी सोसायटी'ने आपल्या इमारतीला पर्यावरणपूरक इमारत बनवण्याचा निर्धार केला आहे. सौरऊर्जा, खतनिर्मिती प्रकल्पापाठोपाठ रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची उभारणी झाल्यास आमची इमारत पर्यावरणपूरक बनेल. त्यामुळे पालिकेच्या वतीने वसूल करण्यात येणाऱ्या करातून आमच्या सोसायटीला सूट देण्यात यावी, अशी मागणी सोसायटीच्या वतीने करण्यात आली.

त्याचसोबत सोसायटीसमोरील रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, सोसायटी बाहेरील जागेत पे अँड पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही सदस्यांच्या वतीने महापालिकेला करण्यात आली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा