गणेशगल्लीत यंदा पाहायला मिळणार राम मंदिराची प्रतिकृती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

मुंबईतल्या लालबाग परिसरातील लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशगल्ली (मुंबईचा राजा) यंदा ९२वे वर्ष साजरे करत आहे. ९२व्या वर्षानिमित्त मागील अनेक वर्षांपासून आयोध्येतील राम मंदिर चर्चेचा विषय ठरला आयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृतीचा देखावा हे मंडळ साकारणार आहे. त्यामुळं या भागात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे

विविध मंदिरांची प्रतिकृती

दरवर्षी लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेशगल्ली या मंडळातर्फे देशातील विविध मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येते. त्यामुळं मुंबईसह राज्यभरातील अनेक भाविक या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गर्दी करतात. हा देखावा पर्यावरणपूरक वस्तूंनी तयार करण्यात येत आहे

अयोध्या पर्यटन विभाग

यंदा राम मंदिराची प्रतिकृती साकारणार असल्यामुळं मंडळातर्फे आयोध्या पर्यटन विभागालाही आमंत्रित करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या लोकांनी आयोध्येतील राम मंदिर पाहिल नाही. त्यांची मोठी गर्दी इथं जमण्याची शक्यता आहे.  


हेही वाचा -

सिद्धार्थ महाविद्यालयाकडून मुलुंडमध्ये वृक्षारोपण

सिद्धार्थ महाविद्यालयाकडून मुलुंडमध्ये वृक्षारोपण


पुढील बातमी
इतर बातम्या