Advertisement

सिद्धार्थ महाविद्यालयाकडून मुलुंडमध्ये वृक्षारोपण

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करणं आवश्यक आहे. हाच विचार करून फोर्टच्या सिद्धार्थ कला, विज्ञानं आणि वाणिज्य आणि वाणिज्य महाविद्यालया तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

सिद्धार्थ महाविद्यालयाकडून मुलुंडमध्ये वृक्षारोपण
SHARES

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित आणि अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणं भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि त्यांचं संवर्धन करणं आवश्यक आहे. हाच विचार करून फोर्टच्या सिद्धार्थ कला, विज्ञानं आणि वाणिज्य आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

  

२७३ झाडं लावली

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मुलुंडच्या एंटरटेनमेंट पार्क इथं वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण व्हावं आणि श्रमाचं मूल्य वृद्धिगत व्हावं याकरीता राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे विविध उपक्रम महाविद्यालय राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यात विविध रोपांची लागवड करण्यात आली. विशेषतः आंबा, बदाम, अशोका, आवळा यासारखी २७३ झाडं यावेळी लावण्यात आली. 


पालिकेचा सहभाग

मुंबई महापालिकेच्या सहकार्यातून वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करून देण्यात आली. विशेषतः महानगर पालिकेचे अधिकारी प्रविण मोरे, शरद गोरे, महेश राणे, शैलेजा सूर्यवंशी यांनी आपले संपूर्ण सहकार्य देऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. वृक्षारोपण कार्यक्रमात विशेष म्हणजे विद्यार्थांचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा