coronavirus इफेक्ट! डॉमीनोज, स्विगीची 'झिरो कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी'

भारतात करोना विषाणूचा प्रसार वेगानं होऊ लागल्यानं सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहेत. याला फास्टफूड चेन सुद्धा अपवाद नाहीत. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी मॅकडोनल्ड, डॉमीनोज यांनी कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी सेवा सुरू केल्या आहेत. त्या यादीत आता स्वीगी आणि झोमॅटो यांचाही समावेश झाला आहे.

झिरो कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी

डॉमिनोजनं देशातील १ हजार ३२५ रेस्टॉरंटमध्ये अशी सेवा सुरू केली आहे. डॉमिनोजच्या ग्राहकांना ही सेवा घेण्यासाठी अॅपचे लेटेस्ट व्हर्जन वापरावं लागणार आहे. त्यात ग्राहक झिरो कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी असा उल्लेख करू शकतील.

अशी आहे ही सेवा

या सेवेनुसार ग्राहकानं ऑर्डर दिल्यावर डिलीव्हरी एग्झीक्युटीव्ह ग्राहकाच्या घरी कॅरीबॅगमधून दारासमोर ठराविक अंतरावर पार्सल आणून ठेवतील आणि स्वतः सुरक्षित अंतरावर उभे राहतील. ग्राहक जोपर्यंत पार्सल घेत नाही तोपर्यंत ते दरवाज्याजवळ उभे राहतील. प्रीपेड ऑर्डरवर सुद्धा ही सेवा उपलब्ध आहे.

डिलिव्हरी बॉय घेणार 'ही' काळजी

त्याचबरोबर ही सेवा देणाऱ्या सर्व कंपन्या त्याचे कर्मचारी स्वच्छता आणि सुरक्षा पालन करत आहेत याची पूर्ण काळजी घेणार आहेत. डिलीव्हरी देणारे ऑर्डरला नुसत्या उघड्या हातानं स्पर्श करणार नाहीत. ठरलेल्या जागेवर पॅकेट ठेवतील असंही स्पष्ट केलं गेलं आहे.

भारतात 'इतके' रुग्ण

भारतात कोरोना संसर्ग झाल्याची संख्या ११४ वर गेली असून जगात या विषाणूनं बळी घेतलेल्यांची संख्या ७ हजारावर गेली आहे. मुंबई देखील या आजारामुळे एका ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्यूनंतर खबरदारी म्हणून उपाय अनेक उपाय केले जात आहेत. मुंबईची लाइफ लाईन रेल्वे आणि बीएसटी बस बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाली नाही. याशिवाय मुंबईतल्या अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.  


हेही वाचा

Zomato आणि Swiggy वर सरकारची नजर

पुढील बातमी
इतर बातम्या