Advertisement

Zomato आणि Swiggy वर सरकारची नजर

फूड रेग्युलेटर FSSAI नं फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्ससाठीचे नियम आणखी कठोर केले आहेत.

Zomato आणि Swiggy वर सरकारची नजर
SHARES

Zomato आणि Swiggy अॅपवरून तुम्ही खाद्यपदार्थ मागवता का? आता सरकारनं या खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटची तयारी केली आहे. फूड रेग्युलेटर FSSAI नं फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्ससाठीचे नियम आणखी कठोर केले आहेत.

Zomato आणि Swiggy या ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांना २०१९ मध्ये सेल्फ ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. या ऑनलाइन फूड कंपन्यांनी ऑडिट करून सुमारे १० हजार रेस्टॉरंट डि लिस्ट केल्या आहेत. डि लिस्ट केलेल्या रेस्टॉरंटना आपल्या यादीतून काढून टाकण्यात आलं आहे. या रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला नसल्यानं या रेस्टॉरंट्सना वगळण्यात आलंययावेळी ऑडिटचा भर स्वच्छतेवर असेल. लिस्टिंगच्या माध्यमातून एनफोर्समेंट होईल. हे रेटिंग 1 ते 5 या रँकमध्ये असेल.

चीनमधली बडी इंटरनेट कंपनी अलिबाबाची सहाय्यक कंपनी अँट फायनान्शिअलने Zomato मध्ये १५ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीसाठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट अॅग्रिगेटर प्लेटफॉर्म Zomato चं व्हॅल्यूएशन ३ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २ हजार १०० कोटी रुपये झालं आहे.

फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) नं मागच्या ६ महिन्यांत डिलिव्हरीचे चार्जेसही वाढवले आहेत. इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, या कंपन्यांनी डायनॅमिक डिस्काउंट देणं सुरू केलं आहे. त्याचबरोबर या कंपन्यांनी ऑर्डर रद्द करण्याचे नियमही कडक केले आहेत

'झोमॅटो' ने काही दिवसांपूर्वीच उबर इट्स (Uber Eats India )ही कंपनी विकत घेतली होती. या डीलनुसार उबरला 'झोमॅटो'चे ९.९९ टक्के शेअर्स मिळाले. झोमॅटोच्या हिशोबानं या शेअर्सची किंमत २ हजार ५०० कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.



हेही वाचा

अंडा समोसा ते चॉकलेट समोसा, इथं मिळतात हटके समोसे, नक्की ट्राय करा

२३ जणांना मिळाला झोपायचा जॉब, ९ तासाचे १ लाख

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा