Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

२३ जणांना मिळाला झोपायचा जॉब, ९ तासाचे १ लाख


२३ जणांना मिळाला झोपायचा जॉब, ९ तासाचे १ लाख
SHARE

प्रत्येक घरात एखाद दुसरा झोपाळू प्राणी असतोच. आता तुम्ही म्हणाल झोपायला कुणाला नाही आवडत? पण तुम्हाला कधी झोपल्यामुळे पैसे मिळाले आहेत का? हो... हो... अगदी बरोबर वाचताय. पैसे आणि झोपण्यासाठी? झोपण्यासाठी कोणी पैसे देतं का? असं कुठे असतं का? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग आता हे वाचून नक्कीच तुमची झोप उडेल की, चक्क झोपण्याचे पैसे एका कंपनीतर्फे दिले जात आहेत. २३ ‘झोपाळूं’ना झोपण्यातून पैसे कमवण्याची संधी मिळाली आहे. यात मुंबईतल्या एका तरुणाचा देखील समावेश आहे.

एका मुंबईकराचा सहभाग

मुंबईतील अनुद सिंग ढाका या तरुणाचा या २३ जणांमध्ये सहभाग आहे. कर्नाटकची (karnatak) ची राजधानी बंगळुरुमध्ये वेकफिट (Wakefit) या स्टार्टअपनं २३ जणांना ही इंटर्नशीप देऊ केली आहे. या लकी इंटर्न्सना १०० रात्र 9 तास झोपण्याचे १ लाख रुपये मिळणार आहेत. या स्टार्टअपकडून लकी ड्रॉ पद्धतीनं २१ भारतीय आणि २ विदेशी नागरिकांची निवड करण्यात आली आहे. या नोकरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीनं दिलेल्या गाद्यांवर ९ तास झोपायचं आहे. त्याचप्रकारे स्लीप ट्रॅकर आणि तज्ज्ञांबरोबर काउन्सीलिंग सेशनमध्येही या उमेदवारांना सहभागी व्हावं लागणार आहे.

इंटर्नशीपमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना कंपनीला एक व्हिडीओ शूट करुन पाठवायचा होता, ज्यामध्ये त्यांना झोप का आवडते? याबाबत स्पष्टीकरण द्यायचं होतं. कंपनीनं या उमेदवारांसमोर जाहीर केलं आहे की, ‘तुम्ही फक्त झोपा, जेवढा वेळ आणि जितकं शांतपणे तुम्ही झोपू शकता तेवढं झोपा. तुम्ही फक्त आराम करा बाकी आमच्यावर सोडा.’


‘स्लीप इंटर्न्स’चं काम काय?

निवडण्यात आलेल्या २३ इंटर्न्सना स्लीप ट्रॅकर देण्यात येणार आहे. या इंटर्न्सना कंपनीकडून देण्यात आलेल्या गाद्यांवर १०० दिवसांसाठी रात्रीचे ९ तास झोपावं लागणार आहे. घरामध्येच या इंटर्न्सना या गाद्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे आठवड्याचे सातही दिवस या इंटर्नना आपल्या घरामध्ये झोपावं लागेल. मुंबई, बेंगळुरु, नोएडा, आग्रा, पुणे, भोपाळमधून २१ भारतीयांची तर अमेरिका आणि स्लोवाकियामधून दोघांची निवड करण्यात आली आहे.


लिंक्डइन (Linkedin) वर देखील या नोकरीबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आलं होतं. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी या नोकरीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. लाखो अर्जदारांनी पाठवलेल्या व्हिडीओनंतर या २३ जणांची निवड करण्यात आली होती. शेवटच्या फेरीमध्ये अभिनेता आणि लेखक शिवांकित सिंह परिहार, अभिनेता नवीन कौशिक, टीव्ही अँकर सायरस बरोचा आणि कॉमेडियन मल्लिका दुआ यांनी या उमेदवारांची निवड केली.


झोपेच्या पॅटर्नवर अभ्यास

वेकफिट इनोव्हेशन प्रायवेट लिमिटेड या कंपनीनं लोकांच्या झोपेच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी ही "स्लीप इंटर्नशिप" सुरू केली आहे.त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 'पायजमा' हा या इंटर्नसचा युनिफॉर्म असणार आहे. वेकफिटचे सहसंस्थापक चैतन्य रामालिंग गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीप इंटर्नशिप लोकांमध्ये शांत झोप परत आणण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे.हेही वाचा

संबंधित विषय
ताज्या बातम्या