हेल्दी केक्स आणि मफिन्स कुठे मिळतील? हे वाचा!

बेकरी प्रोडक्ट्स म्हटले की, मैद्यापासून बनवलेले, साखरेचा अधिक वापर असलेले आणि ग्यूटनयुक्त पदार्थ डोळ्यांसमोर उभे राहातात. पेस्ट्री, केक, ब्रेड, पॅटिस, बिस्कीट्स अशा बेकरीत बनवण्यात येणाऱ्या पदार्थांची मोठी यादी आहे. मैदा आणि साखर यांचे प्रमाण अधिक असल्यानं हे सर्वच पदार्थ खातातच असे नाही. काहींना फक्त हेल्दी खाण्याची सवय असते. जे हेल्थ कॉन्शिअस आहेत, ते बेकरीत बनवण्यात येणारे पदार्थ खाणे टाळतात. बेकरी पदार्थांमध्ये 'हेल्दी' हा प्रकार नसतोच असाच सर्वांचा समज आहे. पण तुमचा हा समज मुंबईतल्या दोन अजब व्यक्तींनी बदलला आहे.

सुमन कारला आणि रोहिणी मक्कड या दोघींनी हेल्थ कॉन्शिअस मुंबईकरांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध केला आहे. या दोघींनी गेझॉन्ड बेकरी चेंबूरच्या आचार्य नगरमध्ये सुरू केली आहे. या बेकरीत बनवण्यात येणारे पदार्थ हे १०० टक्के एगलेस, ग्लूटेन (गव्हात आढळणारे प्रथिन) आणि शुगर फ्री असतात. बेकरी पदार्थांमध्ये मैदा आणि गव्हाच्या पीठाचा वापर केला जातो. मैदा आणि गहू यामध्ये ग्लूटेन नावाचं प्रथिन असतं आणि या प्रथिनाचं अधिक प्रमाणात सेवन करणं आरोग्यासाठी घातक असतं. याचाच विचार करून त्यांनी अशी बेकरी सुरू केली, ज्यात पदार्थ ग्लूटेन फ्री तयार केले जातात.

गेझॉन्ड बेकरी हेल्दी केक्स, केटो केक्स, केटो मफिन्स, डेटॉक्स नुटी पॉप्स, फ्रेश फ्रुट शॉट्स, कपकेक्स आणि मफिन्स हे पदार्थ बनवतात. तुम्ही हेल्थ कॉन्शिअस असाल, तर एकदा तरी या बेकरीला भेट द्या आणि इथल्या हेल्दी पदार्थांचा आस्वाद घ्या!


हेही वाचा

डायबेटिस असूनही तुम्ही गोड खाऊ शकता! हे वाचा!

पुढील बातमी
इतर बातम्या