Advertisement

डायबेटिस असूनही तुम्ही गोड खाऊ शकता! हे वाचा!

डायबेटिस असूनही तुम्ही बिनधास्त गोड पदार्थ खाऊ शकता आणि तुमची शुगर देखील वाढणार नाही. पण एवढं गोड खाल्लं तर शुगर कशी नाही वाढणार? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. नॉट टू वरी...'डायबेटिक शेफ ' आहे ना!

डायबेटिस असूनही तुम्ही गोड खाऊ शकता! हे वाचा!
SHARES

चॉकलेट केक, पेस्ट्री, मिलशेक्स असं बरंच काही समोर होतं. अक्षरश: तोंडाला पाणी सुटलं होतं. मला काही राहावत नव्हतं. इकडे-तिकडे पाहिलं. कुणी दिसत नाही म्हटल्यावर हळूच एक केकचा तुकडा उचलला. खाणार तितक्यात मागून आईचा आवाज. अगं तुला खायचं नाही ते? ठेव तो आधी. माझ्या वाढदिवसाला देखील मला गोड खाण्यावर बंदी! थोडसं खाल्ल्यानं काही होत नाही, हे तिला हजार वेळा सांगून झालं असेल. पण ती काही ऐकायची नाही. मला शुगर असल्यानं घरातच काय, बाहेर सुद्धा माझे वांदे होतात. केक, पेस्ट्री किंवा इतर कुठलाही गोड पदार्थ खाताना माझ्यावर सर्वांच्या नजरा असतात. त्यामुळे डायबेटिक पेशंट्सची अवस्था मी समजू शकते.

पण अखेर मी यातून मार्ग काढला आहे. आता शुगर असूनही मी बिनधास्त चॉकलेट, केक, पेस्ट्री आणि इतर पदार्थ खाऊ शकते. फक्त मीच नाही, तुम्ही देखील बिनधास्त गोड पदार्थ खाऊ शकता आणि तुमची शुगर देखील वाढणार नाही. पण एवढं गोड खाल्लं तर शुगर कशी नाही वाढणार? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. नॉट टू वरी...'डायबेटिक शेफ ' आहे ना! 



'डायबेटिक शेफ' नक्की आहे काय?

हर्ष केडिया हा तरूण डायबेटिक शेफ म्हणून ओळखला जातो. हर्ष १५ वर्षांचा असताना त्याला डायबेटिस असल्याचं कळलं. डायबेटिस असल्यामुळे गोड खाण्यावरून त्याला नेहमीच अटकाव केला जायचा. त्यामुळे अखेर कंटाळून त्यानं साखर नसलेले गोड पदार्थ बनवायचा निर्णय घेतला. जवळपास ३ वर्ष हर्षनं घरच्या घरी अनेक शुगर फ्री गोड पदार्थ बनवले. त्यामध्ये यश मिळतंय हे पाहून हर्षनं अंधेरीत स्वत:ची बेकरी सुरू केली. 'डायबेटिक शेफ किचन' असं या बेकरीचं नाव आहे.


'डायबेटिक शेफ किचन'ची खासियत!

वेगवेगळ्या फ्लेवरच्या ब्राऊनीज, केक्स, चॉकलेट आणि मिल्कशेक्स म्हणजे 'डायबेटिक शेफ किचन'ची खासियत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व गोड पदार्थ शुगर फ्री असल्यानं तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही चॉकलेटसाठी वेडे असाल, तर इथलं डार्क नाईट ब्राऊनी, डार्क नाईट रायसेस आणि बनाना ब्राऊनी नक्की ट्राय करा. वाँका डिलाईट, कंगफू पांडा डिलाईट ब्राऊनी आणि रेड वेल्वेट कुकिज विथ चॉकलेट शेव्हिंग देखील तुम्ही ट्राय करू शकता

याशिवाय मिल्कशेक्सचा आस्वाद देखील तुम्ही घेऊ शकता. मिल्कशेकमध्ये बिग बनाना स्ट्रॉबेरी थिअरी आणि गेम ऑफ कॅफे ट्राय करू शकता. चॉकलेटमध्ये तुम्ही फिलॉसॉफर स्टोन आणि चेंबर ऑफ सिक्रेट्स ट्राय करू शकता.



कसा कराल संपर्क?

आता तुम्हाला कुणी गोड खाण्यापासून रोखू शकत नाही. बिनधास्त इथल्या शुगर फ्री पदार्थांचा आस्वाद घ्या. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल, तर हर्ष केडियाच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला भेट द्या. याशिवाय तुम्ही +919820032093 आणि +919167110451 नंबरवर देखील संपर्क साधू शकता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा