खवय्यांसाठी कुल्फी वॉफल्सची ट्रिट

वॉफल हा मूळचा बेल्जियम पदार्थ. पण हा पदार्थ आता आपल्याकडेही मुबलक प्रमाणात मिळू लागला आहे. वॉफल्स विकणाऱ्या स्वतंत्र कॅफेची संख्याही वाढू लागली आहे. या कॅफेमध्ये वॉफल्सचे अनेक प्रकार मिळतात. चॉकलेट वॉफल, आईस्क्रिम वॉफल, बबल वॉफल्स या प्रकारातील वॉफल्स आपल्यापैकी अनेकांनी खाल्ले असतील. आता या प्रकारामध्ये आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे कुल्फी वॉफल्सची.

खवय्यांसाठी डबल ट्रिट

कुल्फी आणि वॉफल्स हे दोन वेगवेगळे प्रकार आपण खाल्ले आहेत. पण पहिल्यांदाच हे दोन वेगवेगळे प्रकार एक करून कुल्फी वॉफल्स हा भन्नाट पदार्थ सादर केला आहे. मिनिस्ट्री ऑफ वॉफल्स अॅण्ड पॅनकेक्सनं हा नवा प्रकार खवय्यांसाठी लाँच केला आहेकुरकुरीत वॉफल्सवर थंडगार कुल्फीच्या स्लाईजनं सजवण्यात येतं. त्यामुळे तुम्हाला आईस्क्रीम खाल्ल्यासारखंच वाटेल. वॉफल्स आणि कुल्फी यासोबतच तुम्ही रबडी-पॅनकॅक्स आणि कुल्फी शेक्स हे प्रकार देखील ट्राय करू शकता. पॅनकेक्सवर रबडी टाकून रबडी पॅनकेक्स हा प्रकार सर्व्ह केला जातो.

वॉफल्सचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळला असाल तर कुल्फी वॉफल्स हा वेगळा प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. पण हा भन्नाट प्रकार ट्राय करण्यासाठी तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ वॉफल्स अॅण्ड पॅनकेक्सच्या आऊटलेटला भेट द्यावी लागेल.

कुठे : शॉप ६, बिल्डींग २६, मीरा टॉवरच्या समोर, ओशिवरा, अंधेरी (.)


हेही वाचा

'या' ठिकाणी घ्या बेस्ट फाइव्ह वॉफल्सचा आस्वाद

'इथं' घ्या ४०० प्रकारच्या डिजर्टचा आस्वाद!


पुढील बातमी
इतर बातम्या