Advertisement

'इथं' घ्या ४०० प्रकारच्या डिजर्टचा आस्वाद!

'शाही दरबार अॅण्ड आईस्क्रीम फॅक्टरी' यांचं नवीन आऊटलेट आता अंधेरीमध्ये सुरु करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इथं तुम्हाला ४०० प्रकारच्या डिजर्टचा आस्वाद घेता येणार आहे.

'इथं' घ्या ४०० प्रकारच्या डिजर्टचा आस्वाद!
SHARES

उन्हाळा सुरू झाला की सर्वच आईस्क्रीम आणि थंडगार अशा मिल्कशेकवर ताव मारतात. तुम्हाला सुद्धा थंडगार मिल्कशेक आणि आईस्क्रीमचा आनंद घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी नवा पर्याय आम्ही घेऊन आलो आहोत. 'शाही दरबार अॅण्ड आईस्क्रीम फॅक्टरी' यांचं नवीन आऊटलेट आता अंधेरीमध्ये सुरु करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इथं तुम्हाला ४०० प्रकारच्या डिजर्टचा आस्वाद घेता येणार आहे.



शाही मेन्यू

फ्रीकशेकपासून ते फालुदापर्यंत तुम्हाला जे पाहिजे ते 'शाही दरबार अॅण्ड आईस्क्रीम फॅक्टरीत' मिळणार आहे. इथलं 'नायट्रो मँगो आईस्क्रीम' प्रचंड फेमस आहे. फ्रेश क्रीम आणि मँगोच्या छोट्या पीसेसनी नायट्रो मँगो आईस्क्रीम सजवण्यात येतं.



याशिवाय इथलं 'फालुदा किंग'सुद्धा एकदा तरी ट्राय करावंच. फालुद्याच्या वर कुल्फीच्या पीसेसनी सजवण्यात येतं. एक व्यक्ती हा फालुदा संपवणं अशक्यच आहे!



याशिवाय त्यांच्या आऊटलेटमध्ये फ्रेश ज्यूस आणि फ्रूट क्रीमचा देखील आस्वाद घेता येईल. खाण्यामध्ये तुम्ही इथलं 'स्मोकिंग बिस्किट' आणि 'ड्रॅगन ब्रेथ पॉपर्स' ट्राय करू शकता.



इंडियन डिजर्टमध्ये देखील ते मागे नाहीत. तुम्ही त्यांच्या 'गुलाबजामून', 'रबडी' आणि 'मटका रबडी'ची एकदा तरी चव घ्या. त्यांच्याकडे १६ प्रकारच्या मलाई कुल्फी आहेत. याशिवाय त्यांच्याकडची लस्सी, चीजकेक, पान रोल आईस्क्रीम, बबल्स वॉफल्स ट्राय करू शकता.



तु्म्हाला गोड खायला आवडत असेल, तर तुम्ही नक्की इथले ४०० प्रकारचे डिजर्ट ट्राय करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजलाही भेट देऊ शकता.




हेही वाचा

मिल्कशेकचे दिवस गेले आता! फ्रीकशेक ट्राय केलंत का?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा