Advertisement

होऊन जाऊदे, ठंडा ठंडा कुल कुल!

ऊसाचा रस, लिंबाचे-कोकमचे सरबत, पन्हे, नीरा, चिंचेचे पन्हे, जलजिरा अशी पेय पिण्याकडे मुंबईकरांचा जास्त कल असतो. पण तहान भागवणाऱ्या थंड पेयांच्या चवीलाही तितकेच महत्त्व असते. अशाच काही हटके आणि स्वादिष्ट ज्यूसेस आणि मिल्कशेकची ओळख तुम्हाला करून देणार आहोत.

होऊन जाऊदे, ठंडा ठंडा कुल कुल!
SHARES

गेल्या काही दिवसांत मुंबईचा पारा चांगलाच वाढला आहे. ४० अंशांपर्यंत तापमान वाढल्यानं अंगाची अक्षरश: लाही लाही होते. अशा वातावरणात तहान देखील जास्त लागते. घरातून बाहेर पडलं की काही तरी पिण्याची इच्छा निर्माण होते. उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यानं वेगवेगळ्या पेयांद्वारे शरीरातील पाणी टिकवून ठेवता येते. पण आपली तहान भागवणाऱ्या थंड पेयांच्या चवीलाही नक्कीच महत्त्व असते.

ऊसाचा रस, लिंबाचे-कोकमचे सरबत, पन्हे, नीरा, चिंचेचे पन्हे, जलजिरा अशी पेय पिण्याकडे मुंबईकरांचा जास्त कल असतो. त्यामुळे आम्ही मुंबईतल्या अशाच ज्यूस सेंटरची माहिती देणार आहोत. मात्र, नेहमीच घेतल्या जाणाऱ्या ज्यूसपेक्षा काही तरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर मुंबईकर या ज्यूस सेंटरला भेट देऊ शकतात.


) हाजी अली सेंटरहाजी अली

हाजीअली जंक्शनला लागल्यानंतर समोर हिरा-पन्ना मार्केट दिसतं. हिरा-पन्नाकडे पाठ करून उभं राहिलं की, समुद्राच्या बाजूलाच हाजीअली ज्युस सेंटर आहे. ज्युस, मिल्कशेक्स, फालुदा आणि फ्रुट सलाडसाठी हाजीअली ज्युस सेंटर प्रसिद्ध आहे.



वेगवेगळ्या फ्लेवर्सचे ज्युस, फालुदा आणि मिल्कशेकचा आस्वाद तुम्ही इथं घेऊ शकता. मारामारी, गंगाजमुना, मोसंबी, कलिंगड अशा वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या ज्युसचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. चिकू, चॉकलेट, आंबा, कलिंगड, कोल्ड कॉफी असे मिल्कशेकही ट्राय करू शकता.


२) अमर ज्युस सेंटर, विले पार्ले

इर्ला मार्केटमध्ये शॉपिंग करून थकला असाल, तर तुम्ही अमर ज्युस सेंटरला भेट देऊ शकताइथं तुम्ही ताज्या फळांच्या ज्युसचा आनंद घेऊ शकता. इथलं अॅपल आणि अनार ज्युस ट्राय करू शकता. वॉटर मेलन ब्लॉसम आणि पाईनॅपल ब्लॉसम आणि ब्लॅक करंट ब्लॉसम हे फ्लेवर्स तुम्ही ट्राय करू शकता


३) बॅचलर्सगिरगाव

गिरगाव चौपाटीच्या विरूद्ध दिशेला आहे हे बॅचलर्स ज्यूस सेंटर. पहाटे चार-पाच वाजेपर्यंत इथं तरूणांचा कल्ला असतो. व्हरायटी असलेले मिल्कशेक आणि ज्युसेस ही बॅचलर्सची खासियत. तुम्ही गिरगाव चौपाटीवर फेरफटका मारायला गेला असाल, तर नक्की बॅचलर्सला भेट देऊ शकता. फ्रू पंच एक्सॉटिक हे तुम्ही ट्राय करू शकता. यामध्ये कलिंगड, सफरचंद, मोसंबी, लिंबू आणि आलं या सर्वांचा स्वाद तुम्हाला एकाच ज्युसमध्ये घेता येईल.



याशिवाय फ्युजन ज्युस देखील तुम्ही ट्राय करू शकता. प्ल-किवी डिलाईट, चिकू-बनाना डिलाईट, ऑरेंज मेलन डिलाईट असे दोन फ्लेवर्स एकत्र केलेल्या ज्युसचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. चॉकलेट शेकमध्ये देखील वेगवेगळी व्हरायटी इथं पाहायला मिळते.


हेल्थ, सायन

४०० हून अधिक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आणि आरोग्यदायी ज्युस हेल्थ ज्युस सेंटरची खासियत आहे. विशेष म्हणजे ज्युसची नावं बॉलिवूड चित्रपटांच्या नावावर ठेवण्यात आली आहेत. धूम, साथियाबूम अशी इथल्या ज्युसची नावं आहेत. याशिवाय तुम्हाला इथं रातराणी आणि मोगरा या फुलांचे मिल्कशेकही मिळतात. त्या फुलांचा सुवास आणि चव प्रत्येक सिप घेताना तुम्हाला वेड लावतात. मोसंबी, लिंबू आणि खास बूम नावाचा ज्युस इथं मिळतो.



त्याशिवाय च्युइंगम, पानमसाला, दालचिनी, चिक्की, फणस, तुळशी, खोबरं, ऑस्ट्रेलियन फ्रूट प्रून यांचेही मिल्कशेक इथं आहेत. गवती चहाचा ज्युसही इथली खासियत आहे. तुम्हाला काजू, बदाम आवडत असतील, तर ड्राय फ्रुट्स मिल्कशेक देखील तुम्ही ट्राय करू शकता. शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत या ज्युसच्या किंमती आहेत. बट ट्रस्ट मी, वेगळ्या प्रयोगांसाठी ख्याती असलेल्या या ज्युस सेंटरवर आल्यावर लोक किंमतीकडे पाहत नाहीत.


५) बाबा फालुदा, माहिम

बाबा फालुदा या नावावरून तर तुम्हाला अंदाज आला असेल की याची खासियत काय ती? मुंबईच्या नाक्यानाक्यांवर आणि हॉटेलात फालुदा मिळत असला तरी बाबा फालुद्याची बातच काही और... कुल्फीच्या तुकड्यांनी भरलेला वितभर लांबीचा बाबा स्पेशल फालुद्याचा ग्लास एकट्यानं संपवणं म्हणजे टास्कच आहे. स्पेशल फालुदा खाताना ही हालत तर डबल स्पेशल फालुदा खाताना तर चांगलीच तारांबळ उडेल तुमची.



इथल्या प्रत्येक फालुद्यामध्ये शुगर सिरप, शेवया, सब्जा, दूध आणि ड्रायफ्रुट्स वापरले जातात. पण फालुद्यासाठी वापरण्यात येणारं दूध हे म्हशीचं असतं. मिक्स आईस्क्रीम, काजू, बटर स्कॉच, ब्लॅक करंट, रॉयल, चॉकलेट, मलई, केशर, पिस्ता अशा फ्लेवर्सच्या फालुद्यांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. याशिवाय रुहफ्झा कोल्ड, रुहफ्झा आईस्क्रीम, बटरस्कॉच, चॉकलेट, केशर पिस्ता हे मिल्कशेक देखील तुम्ही ट्राय करू शकता. 



हेही वाचा

तुम्ही 'चीझ टी' ट्राय केलात का?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा