Advertisement

तुम्ही 'चीझ टी' ट्राय केलीत का?

चहा केवळ साखर, पावडर आणि दूध याचं उकळतं मिश्रण नव्हे. त्यापलीकडेही चहाचे अनेक चविष्ट अवतार आहेत. त्यापैकीच एक अवतार म्हणजे चीझ टी! आत्तापर्यंत लेमन टी, ग्रीन टी, जिंजर टी असे अनेक प्रकार सर्वांनी चाखले असतील. पण चीझ टी हा भन्नाट प्रकार आता चाखता येणार आहे.

तुम्ही 'चीझ टी' ट्राय केलीत का?
SHARES

खाऊ अड्ड्यांवर खवय्ये आपल्या आवडीनुसार विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. पण खाद्यमैफिलींची खरी रंगत वाढते ती चहानेच! चहा हे भारतीय अतिथ्यशैलीचे प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जात, धर्म, प्रांत या भेदांपलीकडे जात या गरम पेयानं घराघरात स्थान निर्माण केलं आहे. सर्वसाधारणपणे हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये चहा मिळतोच. फक्त चहा पिण्याचे अनेक अड्डे जागोजागी असतातच. पण आता चहामध्येसुद्धा वेगळेपणा यायला लागला आहे. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आता चहाचा आस्वाद घेता येतो.



चीझ आणि चहाचं भन्नाट कॉम्बिनेशन

चहा केवळ साखर, पावडर आणि दूध याचं उकळतं मिश्रण नव्हे. त्यापलीकडेही चहाचे अनेक चविष्ट अवतार आहेत. त्यापैकीच एक अवतार म्हणजे चीझ टी! आत्तापर्यंत लेमन टी, ग्रीन टी, जिंजर टी असे अनेक प्रकार सर्वांनी चाखले असतील. पण चीझ टी हा भन्नाट प्रकार आता चाखता येणार आहे. थोडं विचित्र कॉम्बिनेशन आहे. पण चहा आणि चीझ हे दोन वेगवेगळे पदार्थ कसे एकत्र येतील? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण विसरू नका हे 2018 आहे. इथं सर्व काही शक्य आहे!



चीझ टीची खासियत!

चहा आणि चीझ हे दोन पदार्थ सर्वांच्याच आवडीचे. चहाचा एक घोट घेतल्याशिवाय कुणाची सकाळच होत नसेल. चीझ देखील हल्ली सर्व पदार्थांमध्ये असतंच. आत्तापर्यंत कुणी चीझचा वापर चहामध्ये केला नव्हता. पण कँडी अॅण्ड ग्रीन या रेस्टॉरंटनं ती देखील कसर पूर्ण केली आहे! चीझ आणि चहाचं अनोखं कॉम्बिनेशन असलेला चीझ टी कँडी अण्ड ग्रीन या रेस्टॉरंटनं लाँच केला आहे. कोल्ड टीमध्ये तुम्हाला तळाशी मधाचा गोडवा जाणवेल. तर टॉपला चीझ क्रीम, कन्डेन्स्ड मिल्क आणि त्यावर थोडी वेलची पावडर अशा पद्धतीनं चीझ टी सजवण्यात येतो. एका मोठ्या ग्लासमध्ये चीझ टी सर्व्ह करण्यात येतो. तुम्ही चीझचे चाहते असाल, तर तुम्हाला नक्कीच याचा स्वाद आवडेल!

तुम्हाला सुद्धा रोज तोच तोच चहा प्यायचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही चीझ टी नक्की ट्राय करू शकता. ब्रीच कँडी इथल्या कँडी अण्ड ग्रीन या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही चीझ टीचा आनंद घेऊ शकता.       



हेही वाचा

चहाप्रेमींसाठी स्टारबक्समध्ये मिळणार २१ प्रकारचे चहा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा