चहाप्रेमींसाठी स्टारबक्समध्ये मिळणार २१ प्रकारच्या चहा

स्टारबक्स कॅफेमध्ये २१ प्रकारच्या चहांची चव चाखता येणार आहे. चहाचं उत्पादन घेणारी कंपनी टिवाना आणि अमेरिकेतील प्रसिद्ध कॉफीहाऊस स्टारबक्स यांनी संयुक्तपणे चहाप्रेमींसाठी हे २१ प्रकारचे चहा आणले आहेत.

चहाप्रेमींसाठी स्टारबक्समध्ये मिळणार २१ प्रकारच्या चहा
SHARES

सकाळी जाग आली की सगळ्यात आधी कसली गरज असते, तर ती चहाची! वाफाळत्या चहाचा एक घोट घेताच एकदम तरतरी येते. आपल्यापैकी बहुतेकांचा दिवस चहानेच सुरू होतो. तसा तर चहा वर्षाचे बाराही महिने आपण पितो. पण थंडीत मात्र गरमागरम चहाचे फुरके घेण्याची मजा काही औरच!पण, सर्वांना तरतरी आणणाऱ्या या चहाचे अगदी बोटावर मोजण्याइतके प्रकार आपल्याला माहीत आहेत. आल्याचा चहा, मसाला चहा, ग्रीन टी असे नेमकेच प्रकार सर्वांना माहीत आहेत. पण, स्टारबक्स कॅफेमध्ये २१ प्रकारच्या चहांची चव चाखता येणार आहे. चहाचं उत्पादन घेणारी कंपनी टिवाना आणि अमेरिकेतील प्रसिद्ध कॉफीहाऊस स्टारबक्स यांनी संयुक्तपणे चहाप्रेमींसाठी हे २१ प्रकारचे चहा आणले आहेत.वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि व्हरायटिजमध्ये इथे तुम्हाला चहा मिळेल. गरमागरम चहा जास्तकरून पिणं पसंत केलं जातं. पण कुणाला कोल्ड टी पिण्याची इच्छा असेल, तर त्याची देखील सोय इथं आहे. अर्ल ग्रे ब्रूड टी, जास्वंद आणि डाळिंबाचा चहा, फ्रोजन मॅचा लेमन युझू अशा वेगवेगळ्या प्रकारचे २१ चहा तुम्ही ट्राय करू शकता!

मग आता वाट कसली बघताय? जर तुम्ही चहाप्रेमी असाल, तर एकदा तरी इथले चहा ट्राय कराच!हेही वाचा

कॉफीतून प्या तुमचा फोटो! सेल्फिचिनोमध्ये हे शक्य आहे!


संबंधित विषय