Advertisement

कॉफीतून प्या तुमचा फोटो! सेल्फिचिनोमध्ये हे शक्य आहे!

प्रत्येकाला कॅपेचिनो ही कॉफी चांगलीच माहीत असेल. पण तुम्ही कधी 'सेल्फिचिनो' ऐकलंय का हो? नाही? मग आम्ही तुम्हाला सांगतो की नक्की 'सेल्फिचिनो' म्हणजे काय? 'सेल्फिचिनो' हे काला घोडा इथं सुरू करण्यात आलेल्या कॅफेचं नाव आहे. या कॅफेमध्ये तुम्हाला कॉफीवर स्वत:चा सेल्फी प्रिंट करून दिला जातो. याशिवाय तुम्हाला मेसेज, स्वत:चं नाव किंवा कपल फोटो देखील प्रिंट करून दिला जातो.

कॉफीतून प्या तुमचा फोटो! सेल्फिचिनोमध्ये हे शक्य आहे!
SHARES

कॉफीचे मग, टी शर्ट आणि कुशनकव्हर इत्यादींवर स्वत:चा फोटो प्रिंट करून घेण्याची स्टाईल आता काही नवीन नाही. पण आता तुम्ही कॉफीवर देखील आपला फोटो प्रिंट करू शकता. आहे की भन्नाट? पण स्वत:चा फोटो कॉफीवर कसा प्रिंट होणार? असामान्य बुद्धिमत्तेला विज्ञानाची जोड मिळाली, की सर्व शक्य आहे! सेल्फीच्या तंत्रज्ञानाला एका उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न 'सेल्फिचिनो'च्या माध्यमातून करण्यात आला आहे.



सेल्फीचिनो म्हणजे नेमकं काय?

प्रत्येकाला कॅपेचिनो ही कॉफी चांगलीच माहीत असेल. पण तुम्ही कधी 'सेल्फिचिनो' ऐकलंय का हो? नाही? मग आम्ही तुम्हाला सांगतो की नक्की 'सेल्फिचिनो' म्हणजे काय? 'सेल्फिचिनो' हे काला घोडा इथं सुरू करण्यात आलेल्या कॅफेचं नाव आहे. या कॅफेमध्ये तुम्हाला कॉफीवर स्वत:चा सेल्फी प्रिंट करून दिला जातो. याशिवाय तुम्हाला मेसेज, स्वत:चं नाव किंवा कपल फोटो देखील प्रिंट करून दिला जातो. त्यामुळेच या कॅफेचे नाव 'सेल्फिचिनो' ठेवण्यात आलं आहे. यावर्षीच म्हणजे २२ जानेवारीपासून हा कॅफे सुरू करण्यात आला आहे!




कॉफीवर सेल्फी प्रिंट कसा होतो?

रिपल मेकर थ्रीडी आणि प्रिंट कॉफी एक्सट्रॅक्टला रिपल पॉटमध्ये साठवून ही कला साध्य केली जात आहे. रिपल पॉटमध्ये साठवता येत असल्यानं कस्टमाईज्ड डिझाईन, टेक्स्ट मेसेज, सेल्फी अथवा तुमच्या आवडीचा कुठलाही फोटो कॉफीवर प्रिंट करता येतो. हे डिव्हाईस वेबसाईट अथवा अन्य अॅपशी कनेक्ट करता येते. त्यामुळे ग्राहक ऑनलाईन लायब्ररीतून आपल्या आवडीचे डिझाईन कॉफी फेसवर प्रिंट करून घेतात. याशिवाय स्वत:चा फोटो देखील अपलोड करता येऊ शकतो. प्रिंटिंगसाठी केवळ १० सेकंद लागतात.

तुम्हाला देखील तुमचा फोटो कॉफीवर प्रिंट करून हवा असेल, तर नक्की सेल्फिचिनो या रेस्टॉरंटला भेट द्या. आणि तुमचा एक सुंदर असा सेल्फी कॉफीवर प्रिंट करून घ्या!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा