मिल्कशेकचे दिवस गेले आता! फ्रीकशेक ट्राय केलंत का?

फ्रीकशेक..नाव ऐकायला किती भारी वाटतं ना? फक्त नावच नाही, तर फ्रीकशेक हा प्रकार देखील भन्नाट आहे. पण फ्रीकशेक हा प्रकार कुठून आला आहे? फ्रीकशेक म्हणजे नेमकं काय? फ्रीकशेक कुठे ट्राय करू शकतो?

मिल्कशेकचे दिवस गेले आता! फ्रीकशेक ट्राय केलंत का?
SHARES

अॅल्कॉहॉलिक ड्रिंक किंवा इतर नेहमीचेच मिल्कशेक पिऊन कंटाळला आहात? काही तरी भन्नाट ट्राय करायचंय का? मग तुमच्यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे फ्रीकशेकचा. फ्रीकशेक..नाव ऐकायला किती भारी वाटतं ना? फक्त नावच नाही, तर फ्रीकशेक हा प्रकार देखील भारी आहे. पण फ्रीकशेक हा प्रकार कुठून आला आहे? फ्रीकशेक म्हणजे नेमकं काय? फ्रीकशेक कुठे ट्राय करू शकतो


फ्रीकशेक म्हणजे काय?

अॅल्कॉहॉलिक ड्रिंक सोडून दुसरं काही प्यायचं म्हटलं की आपण ज्यूस, मिल्कशेक यांचाकडे आपला मोर्चा वळतो. पण तेच तेच किती पिणार ना? मग अशांसाठी फ्रीकशेक हा योग्य पर्याय आहे. यामध्ये मिल्कशेक, क्रीम, टॉप्ड विथ केक, टॉप्ड विथ सॉस आणि चॉकलेट अशा वेगवेगळ्या पदार्थांचं मिश्रण असतं. ज्या प्रकारे फ्रीकशेक डेकोरेट करून सर्व्ह केले जातात, ते पाहून तुमच्या तोंडून फ्रीक हा शब्द नक्कीच येईल! मिल्कशेक आणि डिझर्ट यांचं भन्नाट कॉम्बिनेशन म्हणजे फ्रीकशेक!फ्रीकशेक संकल्पना आली कुठून?

तीन वर्षांपूर्वी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियातल्या पॅटिसीज कॅफेत मॉनस्टर ड्रिंक लाँच करण्यात आलं. तेव्हापासून युरोप, युएसए, भारत इथं फ्रीकशेक आवडीनं खाल्लं जातं.हेही वाचा : पाप्पारोती कॅफे, मलेशियन बन्स आणि बरंच काही!कसं बनवतात फ्रीकशेक?

फ्रीकशेकच्या एका जारमध्ये १५०० कॅलरीज असतात. एका मेसन जारमध्ये सुरुवातीला मिल्कशेक अॅड करतात. त्यात क्रीम, केक, कॉफी, सॉस, चॉकलेट, आईसक्रीम, नारळाचं दूध, कंडेन्स्ड मिल्क, कुकीज आणि भरपूर काही एकाच फ्रीकशेकमध्ये अॅड केलेलं असतं. त्यामुळे त्यात जास्त कॅलरीज असतात. बघूनच तुमचं पोट भरेल.मुंबईत कुठे ट्राय कराल फ्रीकशेक?

तुम्हाला फ्रीकशेक ट्राय करायचंय? मग मुंबईतल्या या १० ठिकाणांना भेट द्या. इथं तुम्ही फ्रीकशेक हा भन्नाट प्रकार ट्राय करू शकता.

) कॉफी बाय दी बेला

डोह

डिनशॉ एक्स्प्रेस कॅफे

आईसक्राफ्ट

१४५वांद्रे/काळा घोडा

) स्पॅसो गॉरमे किचन

) टीव्हीला कॅफे

) द रोलिंग पिन

) द चॉकलेट हेवन

१०होपीवालाहेही वाचा

नॉन-व्हेज, चॉकलेट आणि टेस्ट ट्यूब पाणीपुरी! चाखायची असेल तर इथे या!


संबंधित विषय