Advertisement

नॉन-व्हेज, चॉकलेट आणि टेस्ट ट्यूब पाणीपुरी! चाखायची असेल तर इथे या!

मुंबईसारख्या शहरात बोलीभाषा रिती-भाती, पेहराव, मसाले आणि खाद्यसंस्कृतीत वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळते. प्रत्येक राज्यांमध्ये पाणीपुरी ही वेगवेगळ्या नावानं ओळखली तर जातेच. शिवाय प्रत्येकाची चव देखील वेगळी असते. तसं बघता मुंबईत गुजराथी, बिहारी, राजस्थानी, नॉर्थ इंडियन्स समुदायाचे नागरिक राहतात. त्यामुळे मुंबईत सर्व प्रकारच्या पाणीपुरी चाखायला मिळतात. पण बदलत्या खाद्यसंस्कृतीनुसार यात अधिक क्रांती झालीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नॉन-व्हेज, चॉकलेट आणि टेस्ट ट्यूब पाणीपुरी! चाखायची असेल तर इथे या!
SHARES

पाणीपुरी न आवडणारा माणूस विरळाच... चटकदारचटपटीत पाणीपुरी खायला कुणाला नाही आवडणार? सायंकाळच्या निवांत वेळी भूक भागवण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी यंगस्टर्स पाणीपुरीवर चांगलाच ताव मारतात. फक्त यंगस्टर्सच नाही, तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरीची क्रेझ असते. 'भय्या मीडियम देना', 'नहीं नहीं, ये थोडा मिठा हो गया भय्या तिखा देना...' कितीही तिखट लागलं आणि घामाच्या धारा सुटल्या तरी पाणीपुरी ही सर्वच चवीनं खातात.



मुंबईसारख्या शहरात बोलीभाषा रिती-भाती, पेहेराव, मसाले आणि खाद्यसंस्कृतीत वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळते. भारताच्या प्रत्येक राज्यात पाणीपुरी ही वेगवेगळ्या नावानं ओळखली तर जातेच, शिवाय प्रत्येकाची चव देखील वेगळी असते. तसं बघता मुंबईत गुजराती, बिहारी, राजस्थानी, उत्तर भारतीय समुदायाचे नागरिक राहतात. त्यामुळे मुंबईत सर्व प्रकारच्या पाणीपुरी चाखायला मिळतात.

पण बदलत्या खाद्यसंस्कृतीनुसार यात अधिक क्रांती झालीय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आम्ही तुम्हाला पाणीपुरीचे एक से एक प्रकार सांगणार आहोत, ते पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल.


गस्ट्रो पाणीपुरी

आत्तापर्यंत तुम्ही रस्त्यावरची पाणीपुरी ही एका द्रोणमधून खाता. पण लोअर परेलच्या फिर्की आणि स्पाईसक्लमध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीत पाणीपुरी सर्व्ह केली जाईल. एका बोलमध्ये बुंदी आणि मूग दिले जातात. जिरा पाणी हे टेस्ट ट्यूबमधून दिलं जातं. तर इमली चटणी इनजेक्टेबल बॅक्सिन म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या सिरींजमध्ये सर्व्ह केली जाते. फिर्की इथं एका प्लेटसाठी २५० रुपये मोजावे लागतात. त्यात तुम्हाला ८ पुऱ्या खाता येतील. तर स्पाईसक्लब इथं एका प्लेटसाठी ३२५ रुपये आकारले जातात. या प्लेटमध्ये तुम्हाला १२ पाणीपुरी खाता येतात.



फिर्की - ११/१२, ब्लॉक २७, रघुवंशी मिल कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई

स्पाईसक्लब - ८ ए, जनता इंडस्ट्रीयल इस्टेट, फिनिक्स मॉलच्या समोर, सेनापती बापट रोड, लोअर परेलमुंबई



हेही वाचा : कॉफीतून प्या तुमचा फोटो! सेल्फिचिनोमध्ये हे शक्य आहे!



मल्टी फ्लेवर्ड पाणीपुरी

बहुतेक जागी तिखट पाण्यात जिरा फ्लेवर असतं. पण तोच तोच फ्लेवर खाऊन कंटाळा आला आहे? मग आम्ही तुमच्या पाणीपुरीच्या आवडीला एक ट्विस्ट देत आहोत! ओशिवरा इथल्या ओन्ली पराठाजमध्ये तुम्हाला सहा प्रकारच्या पाणीपुरी चाखता येणार आहेत. यात हिंग, जिरा, पुदिना, ऑरेंज, पायनॅपल आणि काला खट्टा या फ्लेवरमध्ये तुम्ही पाणीपुरीचा आस्वाद घेऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकाच प्लेटमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर ट्राय करू शकता. एका प्लेटमध्ये सहा पाणीपुरी येतात. त्यासाठी तुम्हाला १२० रुपये मोजावे लागतील.



बोरिवलीतल्या नाईन्टी फीट इथं तुम्हाला पाणीपुरीमध्ये वेगवेगळे फ्लेवर खाता येतील. पुदिना, डाळिंब आणि पिना कोलाडा (पायनॅपल ज्युस + कोकनेट क्रीम) अशा फ्लेवरमध्ये तुम्ही पाणीपुरी ट्राय करू शकता. नाईन्टी फीट इथं एका प्लेटमध्ये ८ पाणीपुरी येतात. त्यासाठी १७५ रुपये मोजावे लागतील.

नाईन्टी फीट - द रुफ-टॉप, तनिष्क शोरूमवर, लोकमान्य टिळक मार्गबोरीवली


) नॉन-व्हेज गोलगप्पाज

तुम्हाला नॉनव्हेज खायला खूप आवडतं? मग तुमच्यासाठी आता नॉनव्हेज पाणीपुरी हा देखील एक पर्याय आहे! वांद्रेतल्या क्राफ्टबार आणि भायखळ्यातल्या लायन हार्ट्स इथं प्रॉन्स पाणीपुरी आणि सोलकडी शॉट्स हे भन्नाट प्रकार तुम्ही ट्राय करू शकता.



पाणीपुरीत जिरा पाणी हा नेहमीचाच प्रकार झाला आहे. पण जिरा पाणी या फ्लेवरएवजी तुम्हाला सोलकडीचा शॉट दिला जातो. क्राफ्टबारमध्ये ३४५ रुपयांत तुम्हाला ६ पुऱ्यांचा आस्वाद घेता येणार आहे. तर लायन हार्ट्समध्ये २९५ रुपयांमध्ये ४ पुऱ्या खाता येणार आहेत.

क्राफ्टबार - हॉलमार्क बिझनेस प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, चेतना कॉलेज जवळ, कलानगर, वांद्रे (पू)



हेही वाचा : रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कॅफे...बॉम्बे टू बार्सेलोना!


अॅल्कॉहॉलिक पाणीपुरी

याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी! अंधेरीतल्या प्रताप दा धाबा या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये वोडका पाणीपुरी सर्व्ह केली जाते.



यात २४३ रुपयात ६ पाणीपुरी खाऊ शकता. म्हणजे वोडका आणि पाणीपुरी या दोन वेगवेगळ्या गोष्टीचा आस्वाद तुम्ही यात घेऊ शकता.

प्रताप दा धाबा - लिंक प्लाजा, ३०/३१, पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेजवळ, ओशिवरा, म्हाडा कॉलनी, अंधेरी(प)


डिझर्ट गोलगप्पा

पाणीपुरीची चव ही तिखट आणि गोड असते हे आपल्याला माहिती आहे. पण अजून एका अफलातून प्रकारे तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता. डार्क चॉकलेट कोटिंगमध्ये पुऱ्या आणि सर्व्ह करतेवेळी त्यात भरलेला व्हॅनिला शेक!

 


अंधेरीतल्या गॉईला बटर चिकन इथं तुम्ही हा भन्नाट प्रकार ट्राय करू शकता. १२५ रुपयांत तुम्हाला ४ पुऱ्या सर्व्ह केल्या जातील.

गॉईला बटर चिकन - शॉप २६, साई कनवाल कॉम्प्लॅक्स, डी. एन. नगर मेट्रो स्टेशन जवळ, फोर बंगलो, अंधेरी (प.)



हेहा वाचा

मिसळ महोत्सवाला सांस्कृतिक तडका!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा