Advertisement

मिसळ महोत्सवाला सांस्कृतिक तडका!


मिसळ महोत्सवाला सांस्कृतिक तडका!
SHARES

ता मुंबईत एवढे मिसळोत्सव आयोजित होतात की काही विचारायला नको. विले पार्ले, माहिम आणि ठाणे या ठिकाणी आयोजित मिसळोत्सवात खवय्यांनी चांगलाच ताव मारला. इथल्या वेगवेगळ्या स्वादिष्ट अशा मिसळींचा आस्वाद खवय्यांनी घेतला. पण फक्त दोन दिवसच मिसळोत्सवाचं आयोजन का केलं? अशी नाराजीसुद्धा खवय्यांनी व्यक्त केली. पण आता पुन्हा एकदा मिसळोत्सव रंगणार आहे आणि तोही चक्क पाच दिवस! पाच दिवस तुम्ही अगदी मनसोक्त मिसळ महोत्सवचा आनंद लुटू शकता. फक्त मिसळच नाही, तर यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील असणार आहे. त्यामुळे पेटपूजा आणि मनोरंजन अशी मुलुंडकरांची उत्तम सोय झाली आहे.


मुलुंड महोत्सवाचे खास आकर्षण

गेल्या १൦ वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या मुलुंड महोत्सवाचे यंदाचे आकर्षण आहे मिसळ महोत्सव. मिसळ म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण... मो़ड आलेली मटकी, वाटाण्याची उसळ, थोडसं फरसाण, झणझणीत अशी तर्री, त्यावर भुरभुरलेला कांदा, शेव आणि कोंथिंबीर... वा... जबरदस्त... या वर्णनानं खवय्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीची ओळख जपणारी ही मिसळ आता तुम्हाला पाच दिवस चाखता येणार आहे.

मुलुंड महोत्सवात यावर्षी खास खवय्यांसाठी मिसळोत्सव भरवण्यात येणार आहे. १६, १७, १८, १९ आणि २० असे पाच दिवस खवय्ये मस्त झणझणीत अशा वेगवेगळ्या मिसळींचा आस्वाद घेऊ शकतात. शिवाय झणझणीत अशी मिसळ खाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या स्वीट डिश देखील चाखता येणार आहेत!



मुलुंड महोत्सवाची खासियत

'मी मुलुंडकर प्रतिष्ठान'तर्फे दरवर्षी मुलुंड महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. कला महोत्सव, छायाचित्र प्रदर्शन, चित्रप्रदर्शन, बुलेट रॅली, निबंध स्पर्धा, ढोलताशा जुगलबंदी असे अनेक कार्यक्रम या महोत्सवात अनुभवता येणार आहेत. यासोबतच मुलुंडमध्ये प्रथमच नाट्यसंगीत देखील रंगणार आहे. पाडव्याच्या पूर्व संध्येला या संगीतमय महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.



कुठे रंगणार महोत्सव?

मुलुंड इथल्या राजे संभाजी सांस्कृतिक क्लबमध्ये संध्याकाळी ४ ते रात्री ११ दरम्यान तुम्ही या मोहत्सवाचा आनंद घेऊ शकता. मग १६ ते २൦ मार्च हे पाच दिवस तुमचं चांगलंच मनोरंजन होणार हे नक्की!  



हेही वाचा

अवघ्या दोन तासांत शिवून मिळणार ड्रेस!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा