Advertisement

अवघ्या दोन तासांत शिवून मिळणार ड्रेस!


अवघ्या दोन तासांत शिवून मिळणार ड्रेस!
SHARES

कुठल्या तरी कार्यक्रमासाठी घालायला चांगले कपडेच नाहीत हे अवघ्या काही दिवस आधी लक्षात येण्याचे प्रकार आपल्यासोबत अनेकदा घडतात. मग कपडे शिवायला टाकण्याची गडबड-धावपळ सुरू होते. पण शेवटच्या वेळी सर्व टेलर हात वर करतात. अशा परिस्थितीत एकच मार्ग आपण निवडतो तो म्हणजे रेडिमेड ड्रेस. रेडिमेड ड्रेससाठी मग दोन-तीन हजारांचा फटका सहन करावा लागतो. पण वांद्र्यामध्ये असा टेलर आहे जो अवघ्या दोन तासांत तुम्हाला ड्रेस शिवून देऊ शकतो. झालात ना अवाक? ड्रेस शिवून आणि तेही दोन तासात?


सर्व प्रकारचे ड्रेस

वांद्रेतल्या भारतनगर पालिका शाळेच्या जवळ मोहम्मद टेलर आहे. मोहम्मद टेलर तुम्हाला अवघ्या दोन ते तीन तासांत ड्रेस शिवून देऊ शकतात. तुम्ही म्हणाल ड्रेस म्हणजे काय, कुर्ती शिवून देत असतील एखादी. दोन तासात कुर्ती शिवून देणंच शक्य आहे, असाच काहीसा तुमचा समज असेल. पण हा तुमचा गैरसमज आहे. कारण दोन तासांत मोहम्मद टेलर पूर्ण ड्रेसच नाही तर घागरा, सलवार-कमिज, मॅक्सीसारखा ड्रेस आणि वनपीस असं सर्व शिवून देऊ शकतात. विशेष म्हणजे दोन तासांत ड्रेस शिवून दिला म्हणून त्यांच्या शिवण्यामध्ये तुम्ही काहीही चुका काढू शकणार नाहीत. एम्ब्रॉयडरी किंवा घागरा सोडून सर्व प्रकारचे ड्रेस दोन तासांत ते शिवून देऊ शकतात.

तुम्ही मोहम्मद यांना कापड दिलं, तर ते एका घागऱ्यासाठी १ हजार ७०० रुपये आकारतात. एम्ब्रॉयडरी वर्क असेल तर ८००० रूपये तुम्हाला मोजावे लागतील. तुमचं कशा पद्धतीचं काम आहे यावरही किंमत अवलंबून आहे. याशिवाय ते साध्या सलवार सुटसाठी १००० आणि पॅटर्न सलवार सुटसाठी १२०० रुपये आकारतात. तर ब्लाऊजसाठी ८०० आणि १६०० मोजावे लागतील.

जर तुम्हाला देखील कधी घाईत ड्रेस शिवायचा असेल आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसेल, तर मोहम्मद टेलरशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. वांद्रे भारतनगर पालिका शाळेच्या जवळील रूम नंबर २ मध्ये त्याचं टेलरिंगचं शॉप आहे.



हेही वाचा

घरात एकट्या मांजरीचा सांभाळ कोण करणार? गार्डियन ऑफ द पर आहेत ना!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा