Advertisement

घरात एकट्या मांजरीचा सांभाळ कोण करणार? गार्डियन ऑफ द पर आहेत ना!

अनेक वेळा होतं असं, की दोन-तीन दिवसांसाठी किंवा एक दिवस तरी फिरायला जायचा प्लॅन होतोय. पण मांजरीचं करायचं काय? मांजरीचा सांभाळ कोण करणार? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे कॅट सीटर.

घरात एकट्या मांजरीचा सांभाळ कोण करणार? गार्डियन ऑफ द पर आहेत ना!
SHARES

बेबी सीटर हा प्रकार तर सर्वांनाच ठाऊक असेल. पण तुम्ही कधी कॅट सीटर ऐकलंय का हो? पालक घरात नसले की मुलांचा सांभाळ करण्यासाठी आपण बेबी सीटर ठेवतो. तसाच काहीसा हा प्रकार आहे. हल्ली बहुतांश घरांमध्ये मांजर ही असतेच. पण अनेक वेळा होतं असं, की दोन-तीन दिवसांसाठी किंवा एक दिवस तरी फिरायला जायचा प्लॅन होतोय. पण मांजरीचं करायचं काय? मांजरीचा सांभाळ कोण करणार? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे कॅट सीटर.



गार्डियन ऑफ द पर ( purr)

यशश्री काळे आणि मेहार चुंबले हे दोघे एक नवीन संकल्पना घेऊन आले आहेत. 'गार्डियन ऑफ द पर' या नावानं हे दोघं ओळखले जातात. आता जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे आणि मांजरीचं टेन्शन असेल तर नॉट टू वरी. तुम्ही बाहेर जात असाल तर तुमच्या मांजरीचा सांभाळ 'गार्डियन ऑफ द पर' म्हणजेच यशश्री आणि मेहार हे दोघे करतील. मग तुम्ही एक आठवड्यासाठी बाहेर जा किंवा एका दिवसासाठी बाहेर जा, ते तुमच्या मांजरीची संपूर्ण जबाबदारी पार पाडतील. तुमच्या मांजरीच्या खाण्यापासून ते त्यांच्यासोबत वेळ घालवण्यापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी ते चांगल्या प्रकारे घेतात. एका तासासाठी गार्डियन ऑफ द पर ५०० रुपये आकारतात.



यशश्रीनं मॅनेजर म्हणून कॅट कॅफेमध्ये काम केलं आहे. तिथे तिनं जवळपास १०० हून अधिक मांजरींचा सांभाळ केला आहे. कॅट कॅफेमुळेच तिची मांजरींच्या मालकांशी ओळख झाली. त्यातून तिला ही संकल्पना सुचली. कॅट कॅफेमध्ये काम केल्यामुळे यशश्रीला मांजरींबद्दल खूप माहिती आहे. त्यामुळे तिनं या व्यवसायात पाऊल ठेवायचं ठरवलं आणि यात तिला मेहारची साथ मिळाली.



कसं सुचलं गार्डियन ऑफ पर हे नाव?

यशश्री आणि मेहार दोघे एक दिवस गार्डिअन ऑफ गॅलेक्सी हा चित्रपट पाहात होते. तेव्हा त्यांना या नावाची संकल्पना सुचली. त्यातील गार्डिअन हा शब्द त्यांना आवडला. त्यामुळे गार्डिअन ऑफ पर हे नाव ठेवायचं त्यांनी ठरवलं आणि २०१६ मध्ये यशश्री आणि मेहारनं यांनी कॅट सीटर म्हणून काम करायला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी घराघरात जाऊन ५० हून अधिक मांजरींची देखभाल केली आहे. कित्येक मांजरींचे मालक यशश्री आणि मेहार यांच्यावर जबाबदारी सोडून सिंगापूर, दिल्ली किंवा इतर ठिकाणी गेले आहेत.



तुम्हाला सुद्धा कुठे जायचे आहे आणि मांजरीची अडचण होत असेल, तर आता टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी गार्डियन ऑफ पर आहेत ना! तुम्ही त्यांच्या Guardian of the Purr या फेसबुक पेजवर भेट देऊ शकता किंवा +919920118771 या नंबवर संपर्क साधू शकता.



हेही वाचा

व्हिलन्स ऑफ बॉलिवूड अंडर अरेस्ट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा