Advertisement

पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत

अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत आहेत.

पश्चिम रेल्वे सेवा विस्कळीत
SHARES

मंगळवारी सकाळी सुमारे 6.27 वाजता भिलाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना विरार-भरूच मेमू (ट्रेन क्र. 19101) च्या पुढच्या ड्रायव्हिंग मोटर कोचची (डीएमसी) चार चाके रुळावरून घसरली (derailed).

या घटनेत कोणताही प्रवासी किंवा रेल्वे कर्मचारी जखमी झाला नाही.

वलसाडहून (valsad) एक अपघात मदत ट्रेन (एआरटी) आणि अपघात मदत साहित्य रवाना करण्यात आले आहे. तसेच रेल्वे रुळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रेल्वे रुळावरून घसरल्याने पश्चिम रेल्वेच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरा धावत आहेत.

गुजरातहून येणाऱ्या काही गाड्या पर्यायी मार्गांनी वळवल्या जाऊ शकतात. तसेच इंटरसिटी एक्सप्रेस विरार (virar) स्थानकावर 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबवण्यात आली आहे.

या अपघाताचा फटका मुंबईच्या (mumbai) लोकलसेवेवरही पडला आहे. पश्चिम रेल्वेच्या (western railway) अनेक लोकल (mumbai local) उशिराने धावत आहेत.

तसेच ऐन ऑफिसला जायच्या वेळेत गाड्या वेळेवर नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

तसेच लवकरच रेल्वे रुळावर आणून पश्चिम रेल्वेची सेवा पूर्ववत आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत होईल.



हेही वाचा

भाजीपाला भरलेल्या टेम्पोतून खैर लाकडाची तस्करी

मुंबईत 33 ठिकाणी फ्लड गेट उभारणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा