Advertisement

पाप्पारोती कॅफे, मलेशियन बन्स आणि बरंच काही!


पाप्पारोती कॅफे, मलेशियन बन्स आणि बरंच काही!
SHARES

मुंबईकरांना मलेशियाची फेमस कॉफी, बन्स आणि डिजर्ट्सची चव मुंबईत देखील चाखता येणार आहे. कारण मलेशियाचा फेमस कॅफे आता मुंबईत सुरू करण्यात आला आहे. कमला मिल्समध्ये 'पाप्पारोती' कॅफे १८ फेब्रुवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे.पाप्पारोतीची खासियत

पाप्पारोती कॅफे मलेशियात प्रचंड फेमस आहे. हैदराबाद आणि नवी दिल्लीत या कॅफेनं आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता मुंबईत पाऊल ठेवलं आहे.

पाप्पारोती कॅफे ओळखला जातो तो बन्स आणि डिजर्ट्ससाठी. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ आणि नरम असा बन आणि सोबतीला कॉफी. डिजर्ट्स प्रेमींसाठी तर इथं अनेक व्हरायटीज आहेत.

कॅफेत गेलात तर 'लोटस बिस्कीट' हेसुद्धा नक्की ट्राय करा! लोटस बिस्कीट हा नवा पदार्थ नुकताच मेनूमध्ये समाविष्ट केला आहे. फोमी कॅपेचिनो आणि इथलं स्पेशल मिल्क टी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता! मग आजच डेट फिक्स करा आणि भेट द्या 'पाप्पारोती'ला!हेही वाचा

१५० प्रकारचे केक आणि आईस्क्रीम! कुठे? मालाडच्या डिजर्ट बाजारमध्ये!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा