Advertisement

१५० प्रकारचे केक आणि आईस्क्रीम! कुठे? मालाडच्या डिजर्ट बाजारमध्ये!

जर तुम्ही फॅट आणि कॅलरीजची चिंता करत असाल, तर डोंट वरी...त्या वीकएण्डला थोडी जास्त एक्सरसाईज करा. पण डाएटच्या चिंतेत जर तुम्ही एवढी चांगली संधी सोडलीत, तर बाद में बोलने का नै, पैले कायको नई बोला!

१५० प्रकारचे केक आणि आईस्क्रीम! कुठे? मालाडच्या डिजर्ट बाजारमध्ये!
SHARES

डिजर्ट खायला कुणाला नाही आवडत? केक, पेस्ट्री, बिस्कीट, चॉकलेट, आईस्क्रीम...तोंडाला सुटलं ना पाणी? सुटलंच असणार. हे पदार्थ नुसते समोर आले, तर आपल्या डाएटचा बट्याबोळ झालाच म्हणून समजा! मग काय? डाएट बाजूला ठेवून आपण थोडंस तरी खातोच. भले त्यात शूगर असो वा फॅट असो. पण 'थोडासा चलता है' म्हणत आपण डिजर्ट आवडीनं खातो. अशा खवय्यांसाठी मुंबईत लवकरच 'डिजर्ट बाजार' भरणार आहे. हे कळताच कित्येकांची स्वप्न नक्कीच रंगली असतील!


डिजर्ट बाजारमध्ये काय मिळणार?

मुंबईत दुसऱ्यांदा डिजर्ट बाजार आयोजित करण्यात येत आहे. १० आणि ११ मार्च असे दोन दिवस हा डिजर्ट बाजार भरणार आहे. या डिजर्ट बाजारमध्ये खाद्य विश्वात क्रांती करणारे जवळपास २५ ब्रँड्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या अशा १५० प्रकारच्या डिजर्टचा आस्वाद घेता येणार आहे. वेगवेगळ्या फ्लेव्हर्सचे केक, बिस्कीट, डोनट असे भन्नाट आयटम तुम्ही खाऊ शकता!सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व पदार्थांसाठी तुम्हाला कुठेही फिरावं लागणार नाहीएकाच छताखाली तुम्हाला हे सर्व डिजर्ट चाखता येणार आहेत!कुठे भरणार डिजर्ट बाजार?

मालाडमधल्या इनऑर्बिट मॉलमध्ये १० आणि ११ मार्चला डिजर्ट बाजार आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या डिजर्ट बाजारात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणीही सहभागी होऊ शकतं. आई-बाबा, फ्रेंड्स किंवा पार्टनरसोबत तुम्ही वेगवेगळ्या डिजर्ट्सचा आनंद घेऊ शकता. यासोबतच मनोरंजनासाठी फुल्ल टू टाईमपास खेळ आणि तेवढेच टाईमपास कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत.

या बजारमध्ये स्वादिष्ट अशा डिजर्टची मेजवानी आणि सोबतच मनोरंजन हे एकाच छताखाली अनुभवता येणार आहे. बॉस...मग अजून काय पाहिजे? आणि हो..जर तुम्ही फॅट आणि कॅलरीजची चिंता करत असाल, तर डोंट वरी...त्या वीकएण्डला थोडी जास्त एक्सरसाईज करा. पण डाएटच्या चिंतेत जर तुम्ही एवढी चांगली संधी सोडलीत, तर बाद में बोलने का नै, पैले कायको नई बोला!हेही वाचा

मुंबईत पुन्हा आलं तरंगतं हॉटेल!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा