तुमच्या आवडीचे वॉफल्स फक्त १०० रुपयात!

वॉफल हा पदार्थ तसं पाहायला गेला तर बेल्जियमचा आहे. पण मुंबईतही वाॅफलची भारी क्रेझ पाहायला मिळते. वॉफल्स विकणाऱ्या स्वतंत्र कॅफेची संख्याही मुंबईत वाढू लागली आहे. चॉकलेट, मध, आईस्क्रिम किंवा रसरशीत फळांनी गार्निश केलेले वॉफल्स खायला तुम्हाला देखील आवडेल. तुमच्यासाठीच 'द बेल्जियम वॉफल कंपनी' एक भन्नाट ऑफर घेऊन आली आहे.

नॅशनल वॉफल डे 

बेल्जियम वॉफल ही एक युरोपियन डेझर्ट डिश आहे. वाॅफल प्रामुख्याने ब्रेकफास्टला खाण्यात येत असला, तरी हा पदार्थ खवय्यांच्या इतक्या पसंतीस उतरला आहे की, तो कधीही खाल्ला जातो. खवय्यांकडून वॉफलला मिळणारी पसंती आणि 'नॅशनल वॉफल डे' निमित्त 'द बेल्जियम वॉफल कंपनी'नं उत्तम ऑफर दिली आहे. या अंतर्गत फक्त १०० रुपयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉफल्स तुम्ही ट्राय करू शकता.

क्लासिक वॉफल्समध्ये बेल्जियम चॉकलेट, हनी बटर, मॅपल सिरप टू कॉटन कँडी, रेड व्हेलवेटब्ल्यूबेरी अॅण्ड स्ट्रॉबरी क्रिमचीज हे वॉफल तुम्ही ट्राय करा. गोड वॉफल खायचे नसतील तर त्याला देखील पर्याय इथं उपलब्ध आहे. सेवरी वॉफल्स देखील तुम्ही ट्राय करू शकता. सेवरी म्हणजे वॉफल्समध्ये भाजी भरून दिली जाते. याशिवाय आईस्क्रिम वॉफलचा देखील आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

कधी? 

१९ जुलै पुरतीच ही ऑफर मर्यादित असणार आहे. फक्त याच दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे वॉफल्स १०० रुपयांमध्ये मिळतीलअधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

कधी : १९ जुलै  

कुठे : द बेल्जियम वॉफल कंपनी आऊटलेट्स  

किंमत : १०० रुपये


हेही वाचा-

पावसाळ्यात होऊन जाऊदे काही तरी गोड


 

पुढील बातमी
इतर बातम्या