Advertisement

पावसाळ्यात होऊन जाऊदे काही तरी गोड


पावसाळ्यात होऊन जाऊदे काही तरी गोड
SHARES

बाहेर मस्त पाऊस पडताना गरमा गरम चहा आणि भजी खायला कुणाला नाही आवडत. पण आज काही तरी वेगळं होऊन जाऊ दे. चहा आणि चटपटीत भजी तर नेहमीच खातो. पण आज काही तरी गोड खाण्याची इच्छा होत आहे ना ?. मग तुमच्यासाठीच अशा हटके पदार्थांची ओळख आम्ही करून देणार आहोत. मुंबईत तुम्ही या सर्व पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता.


१) कॉफी चूरोज आणि न्यूटेला चूरोज

'टोरो चूरो' इथे तुम्ही चूरज या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. चूरोज हा दिसायला तुटलेल्या चकलीसारखा दिसतो आणि चवीला गोड लागतो. 'कॉफी चूरोज' हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा



कॉफी चूरोजसोबतच 'न्यूटेला चूरोज' हा एक प्रकार तुम्हाला नक्की आवडेल. हा प्रकार म्हणजे एका रोलमध्ये न्यूटेला चॉकलेट टाकलेलं असतं.  चॉकलेट प्रेमींना तर हा प्रकार नक्कीच आवडेल


कुठे - टोरो चूरो, शॉप नंबर १४, सुखसागर बिल्डींग, नंदा पाटकर रोड, चौपाटी, गिरगावमुंबई – ४००००७


२) चॉकलेट फॉन्ड्यू

एक अजून नावीन्यपूर्ण प्रकार म्हणजे चॉकलेट फॉन्ड्यू अर्थात चॉकलेटचे कारंजे.  एका मोठ्या बाऊलमध्ये बेल्झियम लिक्विड चॉकलेट तुम्हाला दिलं जातं. त्या चॉकलेटमध्ये तुम्ही ब्राऊनी, कुरकुरीत बिस्कीट, फळं आणि व्हेनिला केक असे पदार्थ डिप करून खाऊ शकता. 'द रोलिंग पिन' इथं तुम्ही या चॉकलेटच्या कारंज्याचा आस्वाद घेऊ शकता


कुठे -  द रोलिंग पिन, १२ जनता इंडस्ट्रियल इस्टेट, सेनापती बापट रोड, फिनिक्स मॉलच्या समोर, लोअर परेलमुंबई – ४०००१३


३) कुकी डो पुडिंग

'कुकी डो पुडिंग' खाण्यासाठी तुम्हाला ग्रँडमामाज कॅफेला भेट द्यावी लागेल.  केकवर चॉकलेट क्रिम लावतात. त्याचप्रमाणे चॉकलेट कुकीजवर व्हॅनिला आईस्क्रीम लावून तुम्हाला कुकी डो पुडिंग सर्व्ह केलं जातं

कुठे - ग्रँडममाज कॅफे, २० आणि २१, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, दादर (पू.) प्रितम इस्टेटमुंबई – ४०००१४


४) न्यूटेला आणि स्मोरेस मूस केक

'प्लेट अॅण्ड पाईंट' इथं तुम्ही 'न्यूटेला आणि स्मोरेस मूस केक' ट्राय करू शकता. यामध्ये न्यूटेला, मूस आणि केक याचे तीन थर असतात. त्यामुळे एका केकमध्ये तुम्हाला तीन वेगवेगळे प्रकार खायला मिळणार आहेत


कुठे - प्लेट अॅण्ड पाईंट,१०६, भुलाभाई देसाई रोड, पेडर रोडमुंबई – ४०००३६


५) न्यूटेला पिझ्झा

मऊ आणि हलक्या पिझ्झा बेसवर न्यूटेला, केळ्याचे स्लाईस आणि टोस्ट केलेले माशस्मॅलोज असतात. चांगल्या आणि उत्तम चवीचा असा पिझ्झा बनवणं हा '१४४१ पिझेरीया' यांचा उद्देश आहे. पिझ्झा तसा इलेक्ट्रिक अोव्हनमध्ये बेक केला जातो. पण इथं पिझ्झा वूड फायर अोव्हन म्हणजेच निखाऱ्यांवर बेक केला जाणार आहे.



कुठे - १४४१ पिझेरीया, कमला मिललोअर परेल


६) डिकनस्ट्रक्टेड चॉकलेट मड पाय

डार्क आणि मिल्क चॉकलेट क्रम्बंसवर ड्राय फ्रुट्स, आईस्क्रीमनं सजवलेलं 'डिकनस्ट्रक्टेड चॉकलेट मड पाय' नक्कीच तुम्हाला आवडेल. हा हटके पदार्थ ट्राय करण्यासाठी 'व्हेजरेस्टॉरंटला भेट द्या.


कुठे - व्हेज, तळ मजला, फन रिपब्लिक मॉल, शहा इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी(.), मुंबई – ४०००५३


७) रेड वेल्वेट वॉफल्स

'रेड वेल्वेट वॉफल्स'चा आस्वाद घेण्यासाठी वाऊफिल्स आऊटलेटला नक्की भेट द्या



कुठे - वाऊफिल्स, शॉप नंबर -, फिनिक्स मॉलच्या बाहेर, स्पाईस क्लबच्या विरुद्ध, लोअर परेल (.), मुंबई-४०००१३



हेही वाचा

कांदिवलीकरांना घेता येणार 'द बन बिस्ट्रो'चा आस्वाद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा